अक्कलकोट ते नाशिक 'शिवशाही स्लीपर कोच' सेवेला प्रारंभ

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 27 मे 2018

अक्कलकोट : अक्कलकोट ते नाशिक मार्गावर शनिवारपासून राज्य परिवहन महामंडळाची शिवशाही शयनयान वातानुकूलित बससेवा सुरू करण्यात आली
आहे. या सेवेचा शुभारंभ विभागीय वाहतूक अधिकारी विलास राठोड यांच्या हस्ते करण्यात आला. रोज रात्री साडे आठ वाजता ही गाडी अक्कलकोटमधून सुटणार आहे आणि सकाळी सात वाजता ती नाशिकला पोचणार आहे. पुन्हा रात्री नऊ वाजता तिथून निघून सकाळी साडे सहाला ती  अक्कलकोटला पोचणार आहे.

सोलापूर, टेम्भुर्णी, करमाळा, नगर, संगमनेर मार्गे नाशिक असा प्रवास या गाडीचा असणार आहे. या बसमध्ये प्रवाशास एक बेड शीट, पिलो, ब्लँकेट व हॅन्ड टॉवेल आदी सुविधा महामंडळाकडून पुरवण्यात येणार आहे. तीस आसन क्षमतेची ही बस आरामदायी असून या बसच्या प्रवासासाठी ऑनलाइन आरक्षणाची सुविधा देण्यात आली आहे, असेे आगार व्यवस्थापक रमेश मंथा यांनी सांगितले.

यावेळी सुधाकर काळे, श्रीमंत ऐवळे, ज्ञानेश्वर दुरणे, वाहक मुनाळे आदी उपस्थित होते. आता पर्यंत अक्कलकोट आगाराने दोन शिवशाही स्लीपर कोच गाड्या सोडल्या आहेत. त्यांना समाधानकारक प्रतिसाद मिळाल्यास फेऱ्यांची संख्या वाढविण्यात येईल, असे वाहतूक निरीक्षक अशोक बनसोडे यांनी सांगितले. या सेवेसाठी प्रवाशांना १ हजार ३६ रुपये भाडे आकारण्यात येणार आहे. यापूर्वी अक्कलकोट आगाराने मुंबईपर्यंत शिवशाहीची गाडी सुरू केली होती.त्यानंतर आता पुन्हा नाशिक पर्यंत स्लीपर कोच सेवा सुरु केल्याने प्रवाशांत समाधान व्यक्त होत आहे.या सेवेचा सोलापूर व अक्कलकोट शहरातील प्रवाशांनी लाभ घ्यावा, असे आवाहन आगार व्यवस्थापक रमेश मंथा यांनी केले आहे.

Web Title: shivshahi sleeper coach bus akkalkot to nashik