सातारा : शिवशाही बसला अपघात; महामार्गावरील वाहतूक विस्कळित

सातारा : शिवशाही बसला अपघात; महामार्गावरील वाहतूक विस्कळित

नागठाणे (जि. सातारा)  : पुणे- बंगळूर महामार्गावर भरतगाव (ता. सातारा) येथे शिवशाही बसने ऊस वाहतूक करणाऱ्या बैलगाडीस पाठीमागून धडक दिली. या अपघातात सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र, उड्डाणपुलावरून सेवारस्त्यावर कोसळून एक बैल गंभीर जखमी झाला. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, ऊस वाहून घेऊन बैलगाडी अजिंक्‍यतारा सहकारी साखर कारखान्याच्या दिशेने निघाली होती. बैलगाडीत सतीश मुरलीधर जाधव (वय 40), सीमा सतीश जाधव, (वय 35) व पूजा सतीश जाधव (वय 13, सर्व जण, रा. कापशी ता. आष्टी जि. बीड) हे तिघे जण होते. भरतगाव येथील उड्डाणपुलावर कऱ्हाड बाजूकडून साताऱ्याकडे निघालेल्या शिवशाही बसने (एमएच 47 वाय 0307) बैलगाडीस पाठीमागून जोरदार धडक दिली. या अपघातात डाव्या बाजूने चाललेला बैल उड्डाणपुलावरून 13 फूट खाली असलेल्या सेवारस्त्यावर कोसळला. त्यात बैलास गंभीर दुखापत झाली. अपघातानंतर महामार्गावरील वाहतूक काही काळ विस्कळित झाली. घटनेची माहिती मिळताच बोरगाव पोलिस ठाण्याचे हवालदार किरण निकम यांनी तातडीने घटनास्थळी येऊन वाहतूक सुरळीत केली. 
बसचालक मारुती बबन पाटील (वय 38, रा. हातनूर, ता. तासगाव, जि. सांगली) यास पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. अपघाताची नोंद बोरगाव पोलिस ठाण्यात झाली आहे. सहायक पोलिस निरीक्षक चंद्रकांत माळी यांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरू आहे. 

हेही वाचा : म्हसवड : भाविकांना उद्या भुयारातील शिवलिंगाचे दर्शनाची संधी

हेही वाचा : सातारा : आण रे काडेपेटी..काडेपेटी आण रे म्हणतच हॉकर्सने ओतले अंगावर रॉकेल

सातारा : पोवईनाका ते बस स्थानक रस्त्यावर सेव्हन स्टार इमारतीसमोर पथपदावरील अतिक्रमणांवर कारवाई करू नये यासाठी अंगावर डिझेल ओतून आत्महत्येचा प्रयत्न केल्याप्रकरणी दाेघांवर हॉकर्स संघटनेच्या दोन पदाधिकाऱ्यांवर शाहुपूरी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जिल्हाध्यक्ष लक्ष्मण ईश्‍वरा निकम (रा. पाचवड, ता. वाई) व शहराध्यक्ष संजय अर्जुन पवार (रा. करंजे पेठ) अशी त्यांची नावे आहेत. हवालदार विठ्ठल लक्ष्मण खुसपे यांनी याबाबत फिर्याद दिली आहे. 
 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com