शिवशंकर कोळींच्या पाल्यांचे पालकत्व स्वीकारणार

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 15 एप्रिल 2017

देहांगदान जीवनदान संस्था; शिक्षणाचा खर्च उचलण्याची भूमिका

सोलापूर - उस्मानाबादच्या ब्रेनडेड शिवपार्थ कोळी याचे अवयवदान करणारे वडील शिवशंकर कोळी यांच्या कार्याचा गौरव करून त्यांच्या तीन मुलींना शिक्षणासाठी दत्तक घेण्याची भूमिका सोलापुरातील देहांगदान जीवनदान समाजसेवी संस्थेने घेतली आहे. यासाठी दानशूरांना मदतीचे आवाहन करण्यात आले आहे.

देहांगदान जीवनदान समाजसेवी संस्थेची नुकतीच तातडीची सभा झाली. या सभेत उस्मानाबाद येथील शिवपार्थ कोळी याच्या अवयवांचे दान करण्याच्या त्याच्या वडिलांनी घेतलेल्या निर्णयामुळे चारजणांना नवे जीवन मिळाले. या निर्णयाबद्दल शिवशंकर कोळी यांच्या अभिनंदनाचा ठराव करण्यात आला. श्री. कोळी यांची आर्थिक परिस्थिती साधारण असल्याने त्यांना युनिटी मल्टिकॉनचे कफिल मौलवी यांनी नोकरी देऊन अर्थाजनाची व्यवस्था केल्याबद्दल व या प्रक्रियेत ‘सकाळ’ने महत्त्वाची भूमिका बजावल्याबद्दल अभिनंदन करण्यात आले. देहांगदान जीवनदान समाजसेवी संस्था व प्राणीमित्र विलास शिवलाल सर्वोदय ट्रस्ट यांच्या वतीने श्री. कोळी यांच्या मुलींच्या शैक्षणिक खर्चाचा भार उचलण्यासाठी निधी संकलनाचा मांडलेला प्रस्ताव सर्वानुमते मंजूर करण्यात आला. प्राणीमित्र विलास शिवलाल सर्वोदय ट्रस्ट, माढा यांच्या बॅंक ऑफ इंडियातील ०७१२४१०१००००४४०१ (आयएफएससी नं. - बीकेआयडी ००००७२४) या खात्यावर मदत जमा करण्याचे आवाहन करण्यात आले. ही देणगी आयकर कायदा १९६१ कलम ८० ग नुसार करमुक्त असल्याचीही माहिती देण्यात आली. अधिक माहितीसाठी अरुण गोरटे (मो. नं. ९४२२६५१५८८), चंदूभाई देढिया (९८९००२९४००) यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले.

Web Title: Shivshankar koli accept guardianship of children