शिवस्मारकाच्या भूमिपूजनासाठी ५ हजार कार्यकर्ते जाणार - संदीप देसाई

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 20 डिसेंबर 2016

कोल्हापूर - अरबी समुद्रातील खडकावर उभारण्यात येणाऱ्या युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराज यांच्या स्मारकाच्या भूिमपूजन कार्यक्रमास जिल्ह्यातील भाजपचे सुमारे पाच हजार कार्यकर्ते मुंबईला जाणार आहेत. जिल्ह्यातील विविध किल्ल्यांवरील तसेच पवित्र नद्याचे जल खास रथातून कार्यक्रमासाठी नेले जाणार असल्याची माहिती भाजपचे जिल्हाध्यक्ष संदीप देसाई यांनी पत्रकार परिषदेत दिली. 

कोल्हापूर - अरबी समुद्रातील खडकावर उभारण्यात येणाऱ्या युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराज यांच्या स्मारकाच्या भूिमपूजन कार्यक्रमास जिल्ह्यातील भाजपचे सुमारे पाच हजार कार्यकर्ते मुंबईला जाणार आहेत. जिल्ह्यातील विविध किल्ल्यांवरील तसेच पवित्र नद्याचे जल खास रथातून कार्यक्रमासाठी नेले जाणार असल्याची माहिती भाजपचे जिल्हाध्यक्ष संदीप देसाई यांनी पत्रकार परिषदेत दिली. 

विधानसभा निवडणुकीवेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हे स्मारक उभारण्याचे अभिवचन दिले होते. पर्यावरण मंत्रालयासह आवश्‍यक त्या सर्व परवानग्या घेऊन स्मारक उभारणीस परवानगी मिळाली आहे. शनिवारी २४ डिसेंबर रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते मुंबई येथे या स्मारकाचे भूिमपूजन होणार आहे. महाराष्ट्राच्यादृष्टीने हा अत्यंत आनंदाचा आणि अभिमानाचा क्षण आहे. भारतीय जनता पार्टी कोल्हापूर महानगर व जिल्ह्यातर्फे यानिमित्त अनेक उपक्रम राबवण्यात येणार असल्याचे या वेळी सांगण्यात आले. 

जिल्ह्यातील पन्हाळा, रांगणा, भुदरगड, पारगड, विशाळगड, पावनखिंड, सरसेनापती प्रतापराव गुर्जर स्मारक या छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पदस्पर्शाने पावन झालेली माती एकत्र केली जाणार आहे. याशिवाय जिल्ह्यातील पंचगंगा, वेदगंगा, वारणा, कासारी, कुंभी, तुळशी, भोगावती या नद्यातील पवित्र जल कलशांमध्ये एकत्र केले जाणार आहे. 

हे कलश मुंबई येथील कार्यक्रमासाठी नेण्यात येणार आहेत. त्यासाठी अत्यंत देखणा रथ तयार करण्याचे काम सुरू असून त्यातून हे कलश मुंबईकडे रवाना होतील. मुंबईत हे कलश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे सुपुर्द केले जाणार आहेत. 

शुक्रवारी २३ डिसेंबरला पंचगंगा नदी घाटावर भाजपचे कार्यकर्ते व शिवप्रेमी नागरीक एकत्र येवून या कलशांची शहरातून मिरवणुक काढली जाणार आहे. छत्रपती शिवाजी महाराज चौकात येवून तेथे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला दुग्ध व जलाभिषेक घालून हा रथ मुंबईकडे रवाना होईल. या रथाबरोबर शहरातील व जिल्ह्यातील पाच हजार कार्यकर्ते असणार आहेत. या वेळी मर्दानी खेळांची प्रात्यक्षिके, विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन केले आहे. शहरातील विविध चौकात भव्य डिजिटल फलक लावले जाणार आहेत.

या वेळी अशोक देसाई, माजी जिल्हाध्यक्ष महेश जाधव, विजय जाधव, आर. डी. पाटील आदी उपस्थित होते.

Web Title: shivsmarak inauguration 5 thousand employee