मराठा आंदोलकांवरील गुन्हे मागे घेण्यास मुख्यमंत्र्यांशी चर्चा करणार : शिवतारे

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 11 ऑगस्ट 2018

कऱ्हाड : क्रांतीदिनी मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी झालेल्या आंदोलनावेळी मराठा बांधवांवर दाखल झालेले गुन्हे मागे घेण्यासंदर्भात जिल्हाप्रमुखांशी बोलणार असल्याची ग्वाही जिल्ह्याचे पालकमंत्री विजय शिवतारे यांनी आज मराठा समाज बांधवांना येथे दिली. यावेळी मराठा बांधवांनी पालकमंत्री शिवतारे यांना विविध मागण्यांचे निवदेन दिले.

त्यावर झालेल्या चर्चेत महाविद्यालयातील शुल्कातील 50 टक्के सवलतीत केवळ शिक्षण शुल्क माफ करून समाजाची फसवणूक होत असल्याचे निदर्शनास आणून दिल्यावर शिवतारे यांनी अशाप्रकारे केवळ शिक्षण शुल्काची काही रक्कम माफ होत असल्यास ते योग्य नाही, असे नमूद करून शिक्षण शुल्काबाबतचा शासन निर्णय पाहून त्याबाबत मुख्यमंत्र्यांशी चर्चा करू असे स्पष्ट केले.

मुंबईतील आंदोलनावेळी मृत्युमुखी पडलेल्या चाफळ - खोनोली येथील रोहन तोडकर याच्या कुटुंबातील एकाला नोकरी व शासकीय मदत मिळवून देण्यासाठी प्रयत्नशील असल्याचे सांगून त्याबाबतचा जिल्हाधिकाऱ्यांनी प्रस्ताव देण्यासंदर्भात श्रभ. शिवतारे यांनी जिल्हाधिकारी श्वेता सिंघल यांच्याशी दूरध्वनीवरून संपर्क साधून त्याबाबत चर्चा केली.

Web Title: Shivtare will talk to Chief Ministers to withdraw cases against Maratha protesters