शिये-बावडा पूल वाहतुकीस धोक्‍याचा 

 Shiye-bawda bridge is a hazard to traffic
Shiye-bawda bridge is a hazard to traffic

शिये  : पंचगंगा नदीवरील शिये - बावडा मार्गावरील पुलाच्या स्ट्रक्‍चरल ऑडिटला पाच वर्षे झाली पण पुलाच्या दुरुस्तीसाठी निधी उपलब्ध होत नसल्याने सार्वजनिक बांधकाम विभागाला काम करणे अवघड झाले आहे. पालकमंत्री सतेज पाटील यांनी याबाबत पाठपुरावा करून निधी उपलब्ध केल्यास हा पुल प्रवाशांच्या सेवे अविरत कार्यरत राहिल. 

पाच वर्षांपूर्वी 2015 ला पंचगंगा नदीवरील शिये - बावडा पुलाचे स्ट्रक्‍चरल ऑडिट झाले. पुलाच्या दुरुस्तीसाठी सुमारे तीन कोटी रुपये खर्चाची मागणी केली. चार पिलर, दोन अबीटमेंट, जॉईंट व पुलाला असलेल्या आठ बेरिंगची दुरुस्ती अशा कामांचा प्रस्ताव सार्वजनिक बांधकाम विभागाने शासनाकडे दिला. त्यानंतर पंचगंगा नदीला चार वेळा पूर आला. 2019 ला आलेल्या महापुरात हा पूल दहा दिवस पाण्याखाली होता. त्यामुळे या पुलाचे आणखी एकदा स्ट्रक्‍चरल ऑडिट करण्याची गरज आहे. 

कोल्हापूर शहर आणि पुण्याकडे जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्गाला महत्त्वाचा मार्ग म्हणून शिये - बावडा पूलाकडे पाहिले जाते. या पुलाच्या दोन्ही बाजूचे संरक्षण कठडे व पादचारी मार्गाची दुरवस्था झाली आहे. शियेकडून पुलावर येताना तीव्र उतार व वळण आहे. 
या उताराला डाव्या बाजूला वळणावरच पुलाजवळ संरक्षण कठडा नसल्याने वाहने 50 फुट खोल नदीपात्रात कोसळण्यायाची शक्‍यता आहे. या संरक्षण कठड्याची उंची वाढवून दुरुस्ती व्हावी तसेच पादचारी मार्गही व्यवस्थित करावा, अशी मागणी वाहनधारक प्रवाशांतून होत आहे. पुलाला आता 35 वर्षे पूर्ण झाली आहेत.

आयआरबीच्या माध्यमातून कोल्हापुरात कॉंक्रीटचे रस्ते झाल्यानंतर हा रस्ता पुलापर्यंत चार पदरी झाला आहे. त्यामुळे पुणे, मुुंबई असा प्रवास करणाऱ्या वाहनांची वर्दळ वाढली आहे. मात्र दरवर्षी पावसाळ्यात पूर आल्यामुळे हा मार्ग दहा ते पंधरा दिवस बंदच असतो. मात्र या पुलाकडे सार्वजनिक बांधकाम विभागाचे दुर्लक्ष होत आहे. दुरूस्तीसाठी तीन ते चार कोटी खर्च येणार असून तो मंजुरीच्या प्रतिक्षेत आहे. हा निधी मिळणार कधी? आणि प्रत्यक्ष कामाला सुरुवात कधी होणार ? 

शिये पुलाचे सार्वजनिक बांधकाम विभागाकडून स्ट्रक्‍चरल ऑडिट पूर्ण झाले आहे. त्यानंतर 2019 मध्ये आलेल्या महापुरात या पुलावर सुमारे सहा फूट पाणी होते. त्यामुळे हा रस्ता पूल वाहतुकीस अधिकच धोकादायक बनला आहे. शासनान निधी मंजूर करून पुलाची दुरुस्ती करण्याला प्राधान्य द्यावे. अन्यथा पुलावरची वाहतूक रोखावी 
- रणजित कदम सरपंच शिये, 

 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com