सुशीलकुमारांना पाहून अश्रू अनावर...

सुशीलकुमारांना पाहून अश्रू अनावर...

सोलापूर - महाराष्ट्राचे शिल्पकार यशवंतराव चव्हाण यांना पुण्यतिथीनिमित्त अभिवादन करण्यासाठी माजी केंद्रीय मंत्री सुशीलकुमार शिंदे व आमदार प्रणिती शिंदे आले असता, त्यांना पाहून महापौर शोभा बनशेट्टी यांच्या अश्रूंचा बांध फुटला.

महापालिकेतील भाजपचे ज्येष्ठ नगरसेवक सुरेश पाटील यांच्यावर विषप्रयोग झाल्याचे स्पष्ट झाले आहे. विषप्रयोगामध्ये महापौरांसह त्यांचे पती आणि इतर तिघांचा समावेश असल्याचा जबाब पाटील यांनी दिला आहे. त्यामुळे हे पाचही जण जबाब दिलेल्या दिवसापासून तणावात आहेत. बनशेट्टी-शिंदे यांचे पूर्वीपासूनच कौटुंबिक संबंध आहेत. महापौर भाजपमध्ये असल्या तरी शिंदे यांच्यासमवेत त्यांचे नेहमीच जिव्हाळ्याचे संबंध आहेत. त्यामुळे यशवंतराव चव्हाण यांना अभिवादन करण्याच्या ठिकाणी शिंदे यांना पाहिल्यावर महापौरांच्या अश्रूंचा बांध फुटला.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com