पुरुषाच्या बरोबर ‘ती’ही धावतेय (Video)

सुस्मिता वडतीले
शुक्रवार, 3 जानेवारी 2020

शोभा घंटे- कोळी या झोपडपट्टीत राहतात. २ ॲक्टोबर २०१८ पासून त्या रिक्षा शहरात रिक्षा चालवात आहेत. शहरात त्या एकमेव महिला रिक्षा चालक असल्याचे सांगितले जात आहे. जिद्दीच्या जोरावर त्या रिक्षा चालवायला शिकल्या आणि पुन्हा त्या थेट रिक्षा घेऊनच संसाराचा गाडा हाकण्यासाठी व मुलाच्या शिक्षणासाठी रस्त्यावर उतरल्या.  इतर महिलांना नक्कीच त्यांचे धाडस प्रेरणादायी ठरेल.

सोलापूर : ड्रायव्हर म्हटलं की, आजही अनेकांचा त्याच्याकडे बघण्याचा दृष्टीकोन बदलतो. पण, महिलांच ड्रायव्हर असेल तर? अन्‌ तीही सोलापूर सारख्या शहरात. काय वाटतं तुम्हाला? पुरुषांच्या बरोबरीने ‘ती’ सोलापूरकारांची सेवा करत आहे. शोभा रामचंद्र घंटे कोळी असं त्यांचं नाव आहे. कुमठा नाका परिसरात त्या राहतात. त्यांचं वय ४० वर्ष आहे. सकाळी आठ ते सायंकाळी ६.३० या वेळेत त्या शहरातील प्रत्येक भागात रिक्षा चालवतात. सावित्रीबाई फुले जयंतीनिमित्त त्यांच्या या जिद्दीचा ‘सकाळ’ने घेतलेला आढावा.

Image may contain: one or more people and outdoor
हेही वाचा : सावित्रीबाईंचे स्मारक हवे बोलके
सोलापूरातील एकमेव महिला रिक्षाचालक

शोभा घंटे- कोळी या झोपडपट्टीत राहतात. २ ॲक्टोबर २०१८ पासून त्या रिक्षा शहरात रिक्षा चालवात आहेत. शहरात त्या एकमेव महिला रिक्षा चालक असल्याचे सांगितले जात आहे. जिद्दीच्या जोरावर त्या रिक्षा चालवायला शिकल्या आणि पुन्हा त्या थेट रिक्षा घेऊनच संसाराचा गाडा हाकण्यासाठी व मुलाच्या शिक्षणासाठी रस्त्यावर उतरल्या.  इतर महिलांना नक्कीच त्यांचे धाडस प्रेरणादायी ठरेल. शोभा यांचे शिक्षण १२ वीर्पयत झाले आहे. त्यांना लहानपणापूसन ड्रायव्हींग करण्याची इच्छा होती. त्यादृष्टीने त्यांनी पाऊले उचलली आणि ड्रायव्हींग शिकल्या. 

Image may contain: one or more people and outdoor

हेही वाचा : झेडपी अध्यक्षपदामुळे मोहितेंचे ‘समाधान’?
आई- वडीलांची इच्छा

पुढे त्यांनी रिक्षा घेतली आणि सोलापूरकरांच्या सेवेसाठी हजर झाल्या. शोभा म्हणाल्या, माझ्या आई वडीलांचे निधन झाले. पती आचारी म्हणून काम करतात. वडील नेहमी म्हणायचे काहीतरी तु वेगळे करं. तु मुली ऐवजी मुलगा असायला हवी होती, पण मुलगी झालीस. माझं नव करावं, अशी इच्छ आहे. आणि तिच इच्छा पूर्ण करण्यासाठी मी वेगळं काही तरी करण्याचे ठरवलं, असे त्यांनी सांगितले. मी महिला रिक्षा चालक असून सुद्धा महिलांच्या रिक्षात बसायलं महिला प्रवासी धजवत नाहीत, यांची खंत शोभा घंटे कोळी यांनी व्यक्त केली आहे. आम्ही पाच बहिणी आहोत, प्रत्येक बहिण जिद्दीने संसाराचा गाडा हाकत आहे. 

हेही वाचा : साहित्य संमेलनाचे मुख्यमंत्र्यांना निमंत्रण
रिक्षा चावण्यासाठी प्रशिक्षण

त्या पतीसह आठ वर्षाचा मुलागा, बहिणीचे सासू- सासरे यांच्याबरोबर राहतात. बहिणेचे सासू- सासरे यांनाच त्या आई- वडील मानत आहेत. त्यांच्या प्रोत्साहानामुळेच मी रिक्षा चालवू शकत असल्याचे त्यांनी सांगितले. रिक्षा चालवण्यासाठी त्यांनी १० दिवस प्रशिक्षण घेतले. रिक्षा घेण्यासाठी त्यांना बँकेने कर्ज दिले. याबरोबर माजी सहकारमंत्री सुभाष देशमुख यांच्या सोशल फाऊंडेशनने देखील आर्थिक सहाय केले आहे.

Image may contain: 1 person, standing and outdoor

महिलांनी पुढे यावे...
शोभा घंठे- कोळी म्हणाल्या, महिलांनी कोणताही संकोच मनात न ठेवता पुढे यावे. आवड आहे त्या क्षेत्रात आपले कर्तुत्व सिद्ध करावे. शहरातील प्रत्येक थांब्यावर महिलांच्या किमान चार तरी महिलांच्या रिक्षा असाव्यात आशी इच्छा त्यांनी व्यक्त केली. माजीमंत्री देशमुख यांनी माझ्या रिक्षातून प्रवास केला होता. त्यातून मला प्रोत्साहन मिळाले. 

परवाना काढताना भिती...
रिक्षा चालवायची म्हणून आरटीओकडे रिक्षा घेऊन गेले. तेव्हा मी एकटीच महिला रिक्षाचालक असल्याचे सर्वजण माझ्याकडे कुतुहलाने पाहत होते. तेव्हा माझ्या मनात भिती निर्माण झाली होती. जेव्हा परवाना देण्यासाठी आरटीओचे आधिकारी माझ्या गाडीत बसले तेव्हा खूप भिती वाटली, गाडी चालवायला जमेल की नाही, अशी शंका माझ्या मनात येऊन अंगावर काटा आला. आणि तेथूनच मला माझ्या कर्तव्याची आणि पुढे जाण्याची दिशा मिळाली. ती एक माझ्या संघर्षाची परिक्षाच होती. आणि त्यात मी पास झाले. आणि रस्त्याच्यावरचा रिक्षा प्रवास सुरु झाला.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Shobha Ghante is Ricksha drayving