सांगली पालिका क्षेत्रात  धक्का ः 60 पॉझिटीव्ह 

बलराज पवार 
Friday, 24 July 2020

सांगली : सांगली महापालिका क्षेत्रात आज सायंकाळपर्यंत 60 जण कोरोना पॉझिटीव्ह असल्याचा अहवाल आला. यामध्ये सांगलीच्या इंदिरानगर झोपडपट्‌टी आणि मिरजेत दोन्ही ठिकाणी प्रत्येकी 23जणांचे अहवाल पॉझिटीव्ह आले. रॅपिड अँटीजेन चाचणीमुळे लक्षणे नसलेल्या नागरिकांमध्ये कोरोनाची लागण झाल्याचे निष्पन्न होत आहे. 

महापालिकेच्या वतीने गेले पाच दिवस रॅपिड अँटीजेन चाचण्या घेण्यात येत आहेत. त्यामध्ये आज 381 जणांची चाचणी घेण्यात आली. यामध्ये 51 जणांचे अहवाल पॉझिटीव्ह आले आहेत.

यामध्ये विश्रामबाग पोलिस ठाण्यातील चार पोलिस कर्मचाऱ्यांनाही लागण झाल्याचे उघड झाले. तेथे शंभर पोलिसांची चाचणी करण्यात आली होती. तर इतर रुग्णांच्या तपासणीमध्येही नऊजणांचे अहवाल पॉझिटीव्ह आले.

त्यामुळे एकूण आज 60 जणांना कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले. हा आकडा आणखी वाढण्याची शक्‍यता आहे. 

संपादन ः अमोल गुरव 

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Shock in Sangli Municipal Area: 60 Positive