योगेश सोपल, राजेंद्र मिरगणे यांचा धक्कादायक पराभव

सुदर्शन हांडे
मंगळवार, 3 जुलै 2018

बार्शी : बार्शी कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणुकीत माजी आमदार राजेंद्र राऊत गटाच्या बळीराजा विकास आघाडीने शेतकरी गणातील 9 जागी विजय मिळवला. तर आमदार दिलीप सोपल यांच्या शेतकऱ्यांची बाजार समिती वाचवा आघाडीच्या 7 उमेदवारांचा विजय झाला आहे. राजेंद्र मिरगणे यांच्या बार्शी तालुका विकास आघाडीचलचे 2 उमेदवार विजयी झाले आहेत. 

आमदार दिलीप सोपल यांचे पुतणे माजी नगराध्यक्ष योगेश सोपल यांचा तब्बल 401 मतांनी धक्कादायक पराभव झाला आहे. भाजपा नेते राजेंद्र मिरगणे यांचा शेळगाव (आर) गणात पराभव झाला आहे. राऊत गटाचे वासुदेव गायकवाड यांनी त्यांचा पराभव केला. माजी आमदार राजेंद्र राऊत यांचे पुत्र रणवीर राऊत यांचा विक्रमी 1131 मतांनी विजय झाला आहे. 

Web Title: Shocking defeat of Yogesh Sopal and Rajendra Mirgane