थकीत वेतनासाठी परिवहन कर्मचाऱ्यांचे शोले स्टाईल आंदोलन

Agitation
Agitation

सोलापूर : तब्बल 14 महिन्यांचे वेतन थकल्याने संतापलेल्या महापालिका परिवहन उपक्रमातील कर्मचाऱ्यांनी सोमवारी सकाळी जुळे सोलापूर येथील
पाण्याच्या टाक्यावर चढून शोले स्टाईल आंदोलन सुरु केले. चार महिला कर्मचाऱ्यांसह पन्नासहून अधिक कर्मचारी व तितकेच प्रहार संघटनेचे कार्यकर्ते टाकीवर बसले आहेत. जाताना चार दिवसांचे जेवणही सोबत नेले असल्याने पगार मिळाल्याशिवाय खाली उतरणार नाही, असे आंदोलनकर्त्यांनी सांगितले.

थकीत पगारासाठी कर्मचार्यांनी गेल्या शुक्रवारपासून (28 जून) काम बंद आंदोलन सुरू केले आहे. पगार मिळावा यासाठी कामगारांनी भीख मॅंागो आंदोलन करीत महापालिकेवर मोर्चाही नेला होता. संप मिटण्याबाबत सभापती गणेश जाधव यांनी आंदोलनकर्त्यांची भेट घेतली. मात्र 14 महिन्यांच्या पगारावर कामगार ठाम राहिले त्यामुळे आंदोलन सुरुच राहिले. आंदोलनाला दहा दिवस उलटून गेल्यानंतरही त्याची महापालिका पदाधिकारी किंवा प्रशासनाने काहीच दखल घेतली नाही. त्यामुळे
टाकीवर जाऊन आंदोलन सुरु करण्यात आले. 

महापालिकेने गेल्या दोन वर्षांत सुमारे 24 कोटी रुपये परिवहन विभागाला दिले आहेत. 2017-18 मध्ये वेतन, अग्रीम, सेवानिवृत्तीवेतन, वाहन दुरुस्ती, महिला व बालकल्याण समितीची मुलींसाठी मोफत बस प्रवास योजना आणि दिव्यांगाला सवलत यापोटी तब्बल 10 कोटी 47 लाख 11 हजार 299 रुपये, तर 2018-19 या आर्थिक वर्षांत सेवानिवृत्तीवेतन आणि इतर देय रकमांसाठी 12 कोटी 40 लाख आणि मुलींसाठी व दिव्यांगांसाठी मोफत प्रवास यासाठी 1 कोटी 40 लाख असे 13 कोटी 80 लाख रुपये दिले आहेत. कर्मचार्यांच्या वेतनासाठी वर्षाला सहा कोटी रुपये लागतात. मग महापालिकेने दिलेली रक्कम काय झाली असा प्रश्न उपस्थित होत आहे. 

आंदोलनाची दखल घेऊन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तातडीने दोन्ही मंत्र्यांना हस्तक्षेप करण्यास सांगावे आणि थकीत वेतन देण्याची कार्यवाही करावी. अन्यथा यापेक्षाही तीव्र आंदोलन केले जाईल व त्याची जबाबदारी प्रशासनावर असेल.
- जमीर शेख, शहराध्यक्ष, प्रहार कामगार संघटना, सोलापूर

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com