भारत बंदला सोलापूरात अल्प प्रतिसाद 

सकाळ वृत्तसेवा
Wednesday, 8 January 2020

रेल्वे स्टेशनवर सगळकाही सुरळती असताना पहायला मिळाले. सकाळी सात वाजता सोलापूर मुबंईहून सिध्देश्‍वर एक्‍सप्रेस आली त्यावेळी स्टेशन समोरील रिक्षा, दुकाने, चहाच्या टपऱ्या, खासगी वाहतूक सगळ सुरळीत चालू असताना पहायला मिळाले. त्याचबरोबर सकाळी शहरातील सर्व शाळा देखील होत्या. मात्र होटगी रोडवरील राज्य कामगार विमा हॉस्टिल मध्ये तृतीय व चतुर्थ श्रेणीच्या कामगारांनी शंभर टक्के बंद पाळला आहे

सोलापूर : सीटू कामगार संघटना संयुक्त कृती समितीतर्फे आज तृतीय व चतुर्थ श्रेणी वर्गातील कर्मचाऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी सार्वत्रिक देशव्यापी बंद पुकारण्यात येणार होता. मात्र याला सोलापूर शहरात सकाळ पासूनच अल्प प्रतिसाद मिळता दिसत आहे. 

Image may contain: 5 people, people sitting and indoor

रेल्वे स्टेशनवर सगळकाही सुरळती असताना पहायला मिळाले. सकाळी सात वाजता सोलापूर मुबंईहून सिध्देश्‍वर एक्‍सप्रेस आली त्यावेळी स्टेशन समोरील रिक्षा, दुकाने, चहाच्या टपऱ्या, खासगी वाहतूक सगळ सुरळीत चालू असताना पहायला मिळाले. त्याचबरोबर सकाळी शहरातील सर्व शाळा देखील होत्या. मात्र होटगी रोडवरील राज्य कामगार विमा हॉस्टिल मध्ये तृतीय व चतुर्थ श्रेणीच्या कामगारांनी शंभर टक्के बंद पाळला आहे.

Image may contain: 9 people, people standing, crowd and outdoor

मात्र याचा रूग्ण सेवेवर कोणताही परिणाम झाला नाही. हॉस्टिल मध्ये डॉक्‍टर व दुसऱ्या श्रेणीतील कर्मचाऱ्यांनी आपले काम सुरू ठेवले आहे. आजचा बंद हा तृतीय व चतुर्थ श्रेणीतील कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना सुरू करावी. त्याचबोबर 2005 नंतर शासन सेवेत रूज झालेल्यांना सुरू करण्यात आलेली नवीन पेन्शन योजन ही अन्यायकारक आहे ती बंद करावी.

Image may contain: outdoor

शासन आमदार खासदारांना जुनी पेन्शन योजना लागू करू शकते तर तृतीय व चतुर्थ श्रेणीतील कर्मचाऱ्यांना का लागू करू शकत नाही. केंद्र सरकारने केंद्रसरकारच्या सेवत असणाऱ्या महिलांसाठी बालसंगोपनासाठी दोन वर्षाची रजा मंजूर करण्यात आली आहे. मात्र ही योजन राज्य सरकारमध्ये काम करणाऱ्या महिलांना का लागू करू शकत नाही. या सगळ्या मागण्यांचा मान्य करूण घेण्यासाठी आज देशव्यापी बंद पाळ्यात आला आहे.  

 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Short response to Banda of India in Solapur