सांगली जिल्ह्यात पीक कर्जवाटपात राष्ट्रीयीकृत बॅंकांकडून अल्प प्रतिसाद 

विष्णू मोहिते
Friday, 10 July 2020

सांगली, ः सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेने आतापर्यंत 608 कोटी रुपये कर्जवाटप केले आहे. तर राष्ट्रीयीकृत बॅंकांसह इतर बॅंकांनी 35 टक्केच कर्जवाटप केले आहे. राष्ट्रीयीकृत बॅंकांसह अन्य बॅंकांनी कर्ज वाटपासाठी हात अकडता घेतला असल्याचे चित्र आहे. पीक कर्ज वाटपास राष्ट्रीयकृत बॅंकांकडून अल्प प्रतिसाद मिळतो आहे. 

यंदाच्या खरीप हंगामातील पीक कर्जवाटपाची गती वाढली आहे. जिल्ह्यात 832 कोटी रुपये कर्जवाटपाचे उद्दिष्ट आहे. मंगळवार अखेर 
जिल्हा बॅंकेने 89 हजार शेतकऱ्यांना 608 कोटी रूपये पीक कर्ज वाटले आहे. जिल्हा बॅंकेला 832.30 कोटी, तर राष्ट्रीयीकृत व इतर बॅंकांना 724.70 असे एकूण 1557 कोटी कर्जवाटपाचे उद्दिष्ट दिले आहे. त्यानुसार यंदा पीक कर्जवाटपास सुरवात झाली. परंत, कर्ज वाटपाची गती कमी होती. त्यामुळे शेतकऱ्यांना कर्ज मिळण्यास विलंब झाला. ऐन हंगामात शेतकऱ्यांना कर्ज मिळण्याची प्रतीक्षा करावी लागली. जिल्ह्यातील अनेक शेतकऱ्यांची खाती जिल्हा बॅंकेत आहेत. त्यामुळे त्यांना कर्ज पुरवठा होण्यास अडचणी आल्या नाहीत. परंतु, कर्जवाटपाची टक्केवारी समाधानकारक नसल्याने जूनअखेर 60 टक्के कर्जवाटप करण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले होते. 

दरम्यान, तीन आठवड्यापूर्वी कृषिमंत्री दादा भुसे यांनी आढावा बैठक घेतली. त्यात कृषी विभाग, कर्जवाटपाची माहिती घेतली होती. परंतु, खरीप हंगामातील पीक कर्जवाटपाबद्दल त्यांनी नाराजी व्यक्त केली. बॅंकांना 15 जुलैपर्यंत 100 टक्के कर्ज वाटप करण्याच्या सूचना दिल्या होत्या. जिल्हा बॅंक वगळता राष्ट्रीयीकृत बॅंका कर्जवाटपात गती घेणार का? पंधरा दिवसांत 100 टक्के कर्ज वाटपाचे उद्दिष्ट पूर्ण होणार का? असा प्रश्न आहे. 

........ 

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: short response from nationalized banks in crop loan disbursement in Sangli district