वाडा पंचायत समितीत भात बियाणांचा तुटवडा 

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 6 जून 2018

वाडा - पावसाळा अवघ्या काही दिवस उरले असताना वाडा पंचायत समितीच्या कृषी विभागाकडे भातबियांणांचा तुटवडा असल्याचे दिसून येत आहे. शेकडो शेतकरी कृषी विभागाच्या कार्यालयाकडे हेलपाटे मारत आहेत.मात्र बियाणांचा तुटवडा असल्याने शेतकरी नाराजी व्यक्त करीत असून गलथान कारभारावर तीव्र संताप व्यक्त करीत आहेत.  

वाडा तालुक्याला भाताचे कोठार म्हणून संबोधले जाते. येथील वाडा कोलम हा भाताचा वाण राज्यभर प्रसिद्ध आहे.वाडा कोलम या भाताच्या वाणाला मुंबईच्या बाजारपेठेत प्रचंड मागणी आहे. तालुक्यात14 हजार हेक्टर क्षेत्रात भात पिकाची लागवड केली जाते. झिनी, गुजरात 4, गुजरात 11, रूपाली, दप्तरी, कर्जत 5, कर्जत 7, सुवर्णा, पुनम आदी भाताच्या वाणाची लागवड मोठ्या प्रमाणात करतात. भात पिक हे येथील मुख्य पिक आहे. असे असताना वाडा पंचायत समितीच्या कृषी विभागाकडे आत्ताच्या घडीला कोणतेच बि बियाणे शिल्लक नसल्याने तालुक्यातील शेकडो शेतकरी या विभागाकडे हेलपाटे मारत आहेत. हजारो हेक्टर भातशेती येथे केली जात असताना बी बियाणांचा येथे पत्ताच नसल्याने शेतकरी कृषी प्रशासनावर नाराजी व्यक्त करीत आहेत.  

कृषी विभागाकडे बि बियाणे हे पन्नास टक्के सवलतीच्या दरात मिळते. त्यामुळे शेतकरी पंचायत समितीमार्फत दिल्या जाणाऱ्या बि बियाणांना पसंती देतात. मात्र यावर्षी पंचायत समितीच्या कृषी विभागाने शासनाकडे काही टन बियाणांची मागणी करूनही फक्त 150 क्विंटल कर्जत हे बियाणे येऊन ते संपलेही त्यामुळे बियाणांसाठी शेतकरी कृषी विभागाकडे हेलपाटे मारत आहेत. वाडा पंचायत समितीचा कृषी विभाग किती दक्ष आहे तसेच त्यांची उदासीनता यावरून दिसून येत आहे. 

Web Title: shortage of rice seed in Wada Panchayat Samiti