महामार्गावरचा 'शॉर्टकट' बेततोय जीवावर ; 100 हून अनेकांचा मृत्यू

सचिन शिंदे
शनिवार, 12 मे 2018

कऱ्हाड : येथे व परिसरातील अनेक नागरिक कशाचाही विचार न करता बिनधास्त महामार्ग ओलांडत आहेत. त्यांचा महामार्ग ओलांडण्याचा शॉर्टकट त्यांच्याच जीवावर बेतत आहे. तालुक्यातून जाणाऱ्या महामार्गावरील वाठार ते इंदोली फाट्यापर्यंतच्या किमान तीस किलोमीटरच्या टप्प्यात वर्षभरात किमान शंभर लोकांचा मृत्यू झाल्याची नोंद पोलिसांत झाली आहे.  

महामार्गावर मधोमध असणाऱ्या दुभाजकावर संरक्षण जाळी बसवली आहे. मात्र त्याचे ग्रील तोडून त्यातून लोकांनी मार्ग काढला आहे. त्यामुळे वाहनांची ठोकर बसून अपघात होताना दिसत आहे. महामार्गावर मोठी वाहने भरधाव असतात. त्याचा अंदाज न घेताचा महामार्ग ओलांडण्याचा शॉर्टकट अनेकदा अबालवृद्धांच्या जीवावर बेतत आहे. नागरी वस्तीत अनेक ठिकाणी रस्ता देखभाल विभागाने महामार्गासह उपमार्गावर लोखंडी संरक्षण रॅलिंग बसविले आहेत.

काही महिन्यांपूर्वी संरक्षण रॅलिंगच्या काही भाग कापून काढण्यात आला. पर्यायाने त्यातून लोक वाकून जात आहेत. त्यामुळे धोका अधिक वाढल्याचे दिसते आहे. कोल्हापूर नाका, उंब्रज, नांदालापूर, कोयना वसाहत प्रवेशव्दार येथे तो प्रखार सर्सास पहावयास मिळतो. शाळेत ये-जा करणारे विद्यार्थ्यांसह मोठी लोक व महिलाही तेथून जाताना दिसत आहेत.

काही तरूण रेलिंगवरून उडी मारून जातात. तोल न सावरल्यास ते वाहनांवर जाऊन धडकल्याच्याही घटना आहेत. भराव पुलाखालून वाहने व पादचारी यासाठी मार्ग आहेत. मात्र त्याचा वापरच कोणी करताना दिसत नाही.  लोकांचा हा अततायीपणा पाहून महामार्गावर संरक्षणासाठी रेलिंग बसवले आहे. मात्र त्यातूनही मार्ग शोधण्याचा लोकांचा शार्टकट जीवघेणा ठरतो आहे. 

सर्वात जास्त धोक्याची ठिकाण 

- कोल्हापूर नाका
- वाठार
- पाचवड फाटा
- नांदालापूर
- मलाकपूर फाटा 
- कोयना वसाहत कमान
- ढेबेवाडी फाट्याहून महामार्गावकडे जाणारा मार्ग
- खोडशी
- वाहगाव
- उंब्रज 
- इंदोली फाटा 
 
Web Title: The shortcut on the highway catches up Deaths