चला, शॉर्टफिल्म कार्निव्हलला..!

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 6 मे 2018

कोल्हापूर - जगभरातील विविध महोत्सवांत बक्षिसांची लयलूट केलेल्या लघुपटांची पर्वणी शुक्रवारी (ता. ११) कोल्हापूरकरांना मिळणार आहे. राजर्षी शाहू स्मारक भवनात दिवसभर या लघुपटांचा आस्वाद घेता येईल. 

अभिनेता प्रियदर्शन जाधव, चिन्मय मांडलेकर, अनिकेत विश्‍वासराव, प्रार्थना बेहेरे आदींच्या प्रमुख उपस्थितीत सकाळी दहाला उद्‌घाटनाचा दिमाखदार सोहळा होईल. दरम्यान, कोल्हापूर शॉर्टफिल्म क्‍लबने कार्निव्हलचे आयोजन केले असून, ‘सकाळ’ माध्यम समूह माध्यम प्रायोजक आहे. 

कलेचे माहेरघर म्हणून प्रसिद्ध असणाऱ्या कोल्हापुरातील चित्रपट निर्मिती मध्यंतरीच्या काळात कमी झाली. केवळ देदीप्यमान इतिहास अभिमानाने सांगण्यापेक्षा भविष्यातही चित्रपंढरी ही ओळख कायम ठेवण्यासाठी चार वर्षांपासून येथील तरुणाई पुढे सरसावली आणि ती विविध विषयांवरील लघुपट निर्मिती करू लागली. चार वर्षांत त्यांच्या यशाचा आलेख उंचावत गेला. एकेका लघुपटाने तर चाळीसहून अधिक पुरस्कार मिळविले आहेत.

‘चौकट’, ‘बलुतं’ हे लघुपट ‘इफ्फी’मध्ये झळकले; तर ‘अनाहुत’ने यंदा प्रेक्षक पसंतीचं फिल्मफेअर ॲवॉर्ड मिळविलं. ‘सावट’, ‘डेरू’, ‘कॉस्ट अवे’ आदी लघुपटांनी बक्षिसांची लयलूट केली. काही लघुपटांनी कान्स महोत्सवापर्यंत मजल मारली. कालच (ता. ४) मेधप्रणव पोवारच्या ‘हॅप्पी बर्थ डे’नं राष्ट्रीय पुरस्कार स्वीकारला. चित्रपट निर्मितीचा पुढचा टप्पा गाठताना आता प्रत्येकाचे प्रयत्न एकत्र आले तर भविष्यातील चित्रपंढरीचे स्वप्न साकारले जाऊ शकेल, या उद्दात हेतूने एकाच छताखाली पुरस्कारप्राप्त लघुपट प्रदर्शित होणार आहेत. महोत्सवाला तरुणाईने मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन क्‍लबने केले आहे. दरम्यान, जीएस चहा, बी न्यूज, रेडिओ मिर्ची आणि स्वॅन डिजिटल यांचे विशेष सहकार्य मिळाले आहे.

मोफत प्रवेशिका
कलापूरच्या फिल्ममेकर्सच्या कलाकृती यानिमित्त एकाच दिवशी पाहण्याची पर्वणी असेल. महोत्सवाच्या मोफत प्रवेशिका लवकरच उपलब्ध केल्या जाणार आहेत.

Web Title: shortfilm carnical