बृहत आराखड्याबाबतचा घेतलेला निर्णय त्वरीत दुरुस्त करावा- बारसकर

राजकुमार शहा 
बुधवार, 22 ऑगस्ट 2018

बृहत आराखड्याबाबतचा घेतलेला निर्णय त्वरीत दुरुस्त करावा अशी मागणी मोहोळ चे नगराध्यक्ष तथा राष्ट्रवादीचे नुतन प्रदेशचिटणीस  रमेश बारसकर यांनी एका निवेदनाव्दारे पालकमंत्र्याकडे केली आहे.
 

मोहोळ- बृहत आराखड्याबाबतचा घेतलेला निर्णय त्वरीत दुरुस्त करावा अशी मागणी मोहोळ चे नगराध्यक्ष तथा राष्ट्रवादीचे नुतन प्रदेशचिटणीस  रमेश बारसकर यांनी एका निवेदनाव्दारे पालकमंत्र्याकडे केली आहे.

या संदर्भात अधिक माहिती देताना बारसकर म्हणाले, गेल्या महिन्यात लोकशाहीर आण्णा भाऊ साठे नागरी दलित वस्ती सुधारणा योजनेची जिल्हा स्तरीय बैठक संपन्न झाली या बैठकीमधे पालकमंत्री विजयकुमार देशमुख यांनी बृहत आराखड्या शिवाय कुठल्याही विकास कामांना प्रशासकीय मान्यता मिळणार नाही अशी बैठकीमधे अधिकाऱ्यांना सुचना दिली आहे तशा आशयाचे लेखी पत्र प्रशासनाकडुन मोहोळ नगर परिषदेला  प्राप्त झाले आहे  तेव्हापासून अधिकाऱ्यांनी अडवणुकीचे धोरण अवलंबीले आहे.

शहराअंतर्गत असणाऱ्या सर्व वस्त्या गल्ली तसेच प्रभागाच्या विकास कामाचा बृहत आराखडयास मंजुरी मिळणार नसल्याच्या पालकमंत्र्याच्या या आदेशामुळे त्याचा थेट परिणाम शहर विकासावर होणार असुन नगराध्यक्ष व नगरसेवकांच्या अधिकारावर गदा येणार आहे अशा प्रकारचा निर्णय इतर कुठल्याही जिल्यात लागु नसल्याचेही बारसकर यांनी निवेदनात नमुद केले आहे.

आराखडयास आमचा विरोध नसुन हा आराखडा स्वतंत्र यंत्रणा नेमुन करावी अशीही मागणी बारसकर यांनी केली आहे याबाबत पालकमंत्री काय निर्णय घेतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Web Title: Should resolve the decision taken regarding city plan says Baraskar