संख्याबळ दाखवा, महापौर व्हा - पतंगराव कदम

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 24 एप्रिल 2017

सांगली - सांगली, मिरज, कुपवाड महापालिकेतील महापौरपदासह उपमहापौर, गटनेत्यांना एकाच वेळी बदलले जाईल. संख्याबळ दाखवा, महापौर व्हा.. अशी भूमिका कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते आमदार पतंगराव कदम यांनी आज येथे पत्रकारांशी बोलताना व्यक्त केली. 

आमदार कदम यांच्या अध्यक्षतेखाली आमराई क्‍लबवर महापालिका क्षेत्र कॉंग्रेसची बैठक झाली. नेत्या जयश्री पाटील, शहरजिल्हाध्यक्ष पृथ्वीराज पाटील उपस्थित होते. विशाल पाटील, उपमहापौर विजय घाडगे यांच्यासह नऊ नगरसेवकांनी बैठकीला दांडी मारली. नगरसेवकांनी आमदार कदम यांच्याशी स्वतंत्र चर्चा केली. बैठकीत प्रत्येकांची मते ऐकून अंतिम निर्णय जाहीर केला जाणार आहे. 

महापालिका निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर जाहीरनाम्यात दिलेल्या आश्‍वासनातील 70 टक्के कामे पूर्ण झाल्याचा दावा श्री. कदम यांनी केला. येत्या सहा महिन्यांत उर्वरित कामे मार्गी लावू, असेही ते म्हणाले. महापालिकेत कॉंग्रेसचे संख्याबळ 41 आहे. एक अपात्र ठरला. 40 पैकी 27 नगरसेवक उपस्थित राहिले, तर चौघे शहर-जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज पाटील यांना सांगून गैरहजर राहिले आहेत. 

श्री. कदम म्हणाले,""कॉंग्रेसने 10 महिन्यांनी महापौर बदलाचा निर्णय घेतला होता. पक्षातील गडबडीच्या पार्श्‍वभूमीवर संख्याबळाचा विचार करूनच बदल केला जाईल. महापौरांसह उपमहापौर, गटनेत्यांनाही बदलले जाईल. उपमहापौर राजीनामा देणार का ? यावर आमदार कदम म्हणाले,""उपमहापौर एक दुर्दैव आले. चार वर्षांतील कामकाजाचा आढावा घेतला.'' 

महापौर हारुण शिकलगार, गटनेते किशोर जामदार, इद्रिस नायकवडी, विवेक कांबळे, महापौर पदासाठीचे इच्छुक नगरसेवक राजेश नाईक व रोहिणी पाटील उपस्थित होते. 

आघाडी झाली तरच  महापौर निवड सोपी... 
महापौर किंवा अन्य पदाधिकाऱ्यांना बदलासाठी कॉंग्रेसकडे पुरेशा संख्याबळाचा अभाव स्पष्ट दिसत आहे. त्यामुळेच स्थायी समितीच्या निवडणुकीत राष्ट्रवादीकडून हार पत्करावी लागली. आगामी महापालिका निवडणुकीत कॉंग्रेस-राष्ट्रवादी आघाडी होणार आहे. या पार्श्‍वभूमीवर दोन्ही पक्ष एकत्र आले तर महापौर बदलाचा निर्णय होऊ शकतो. 

तीन महिन्यांत पूर्ण होणारे प्रकल्प... 
70 एमएलडीचा 124 कोटींचा प्रकल्प 
24 कोटींचे रस्ते 
सांगली-कुपवाडला गॅसदाहिनी 
एनआरएचएम अंतर्गत 10 दवाखाने (दोन सुरू) 
मिरजेत 100 कोटींची विकासकामे 

Web Title: Show the strength of the mayor