नोटाबंदीने नुकसानीबद्दल भरपाईची ‘श्रमुद’ची मागणी

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 13 जानेवारी 2017

सांगली - नोटाबंदीनंतर काळा पैसा किती बाहेर आला ते केंद्राने जाहीर करावे. शेतमाल दरातील घसरणीची भरपाई द्यावी, शेतकऱ्यांची कर्जे माफ करावीत, यासाठी श्रमिक मुक्ती दलातर्फे जिल्हाधिकारी कार्यालयावर आज मोर्चा काढण्यात आला. सरकारने शेतकऱ्यांना नुकसानभरपाई, कर्जे माफ केली नाहीत तर पुन्हा तीव्र आंदोलनाचा इशारा देण्यात आला.  

श्रमिक मुक्ती दलाचे आनंदराव पाटील, अण्णासाहेब पत्की, ॲड. कृष्णा पाटील, दाजी शेलार, सुरेश पाटील, शंकर देसाई, गणपती खरात, विकास मोहिते, विष्णू पाटील, विकास पवार यांच्या नेतृत्वाखाली मोर्चा निघाला. महिलांची संख्या 
लक्षणीय होती. नोटाबंदीनंतर अत्यंत कमी प्रमाणात काळा पैसा बाहेर आला. उरलेला बाहेर काढण्यासाठी उपाय तातडीने करावेत, नोटाबंदीनंतर कांदा, टोमॅटो, डाळिंब, द्राक्ष, शेवगा, भाजीपाल्याचे दर कोसळले, शेतकरी उद्‌ध्वस्त झाला. त्यांना भरपाई द्यावी, रब्बी हंगामाच्या तोंडावर चलन उपलब्ध नसल्याने बियाणे, खते खरेदी करता आली नाहीत. मोठे नुकसान झाले. शेतकऱ्यांना भरपाईचा भाग म्हणून त्यांची कर्जे माफ करा. शेतीपूरक व्यवसाय, उद्योगातील मंदीमुळे कामगारांच्या नोकऱ्या गेल्या, मजुरांना काम मिळत नाही, यापुढेही उत्पादन करणे शक्‍य नाही.

Web Title: shramik mukti dal compensation demand for currency ban