श्रीधर फडके यांच्याकडून अजरामर गीतांचा नजराणा सादर

राजशेखर चौधरी
शनिवार, 21 जुलै 2018

अक्कलकोट (सोलापूर) : स्वरगंधर्व कै. सुधीर फडके यांच्या अजरामर गीतांचा नजराणा अन्नछत्र मंडळाच्या प्रांगणात हजारो भक्त जनांच्यासमोर प्रख्यात गायक श्रीधर फडके यांनी सादर केला.

अक्कलकोट (सोलापूर) : स्वरगंधर्व कै. सुधीर फडके यांच्या अजरामर गीतांचा नजराणा अन्नछत्र मंडळाच्या प्रांगणात हजारो भक्त जनांच्यासमोर प्रख्यात गायक श्रीधर फडके यांनी सादर केला.

अन्नछत्र मंडळाच्या वर्धापनदिन व गुरुपौर्णिमा उत्सवात चौथे पूष्प श्रीधर फडके यांनी बाबूजीची गाणी गुंफली. कार्यक्रमाचा शुभारंभ सिंहगड शिक्षण संस्थेचे प्रमुख संजय नवले, रूपाली इंगळे, कोमल क्षिरसागर, वर्षा हिप्परगी, लता कुलकर्णी रूपाली शहा, या विविध क्षेञातील मान्यवरांच्या हस्ते समर्थ पूजन आणि दीप प्रज्वलीत करून करण्यात आला.सर्वांचा सत्कार अन्नछत्र अध्यक्ष जन्मेजय भोसले यांच्या हस्ते करण्यात आला. तर अन्नछत्र कार्यकारी विश्वस्त अमोल भोसले यांच्या हस्ते पत्रकार संघाचे अध्यक्ष प्रशांत भगरे, शिवानंद फुलारी, अरविंद पाटील,योगेश कबाडे यांना सन्मानित करण्यात आले.

श्रीधर फडके यांनी ' देव नाही देव्हाऱ्यात', सखे मंद झाल्या तारका, संथ वाहते कृष्णामाई,   घरटे तूझे अंगणात, ज्योती कलश छलके,  ब्रम्हा विष्णू आणि महेश्वर सामोरी बसले आदी एकाहून एक सरस गीतांनी बहार आणली.या वेळी अन्नछञ उपाध्यक्ष अभय खोबरे, सचिव शाम मोरे, खजिनदार रविद्र भंडारे, विश्वस्त अलकाताई भोसले, अनुया फुगे, अर्पिता भोसले, अनिता खोबरे, दर्शना लेंगडे, मिनल शहा, सुरेश सुर्यवंशी,अॅड संतोष खोबरे , लाला राठोड,बसवराज लोंढे, मराठा सेवा संघ अध्यक्ष मनोज इंगवले,बाळासाहेब देसाई, प्रशांत शिंदे,मैनोद्दीन कोरबू, छोटू शिरसाठ यांच्या सह हजारो भक्तजन उपस्थित होते.सुत्रसंचलन श्वेता हूल्ले यांनी केले.

Web Title: shreedhar phadake program in akkalkot