नाम घोषात श्रींच्या पालखीचे शुक्‍लतीर्थाकडे प्रस्थान

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 12 ऑगस्ट 2016

कोल्हापूर - श्री गुरुदेव दत्त, दिगंबरा... दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा अशा नामघोषात टाळ मृदुंग, झांज, घंटा, गजर व ब्रम्हवृंदांच्या एका सुरात म्हटलेल्या पदे व आरत्यांच्या निनादात आणि भाविकांच्या अपूर्व उत्साहात श्रींच्या (श्रीदत्ताच्या) पालखीचे शुक्‍लतीर्थाकडे आज (गुरुवार) दुपारी प्रस्थान झाले.

कोल्हापूर - श्री गुरुदेव दत्त, दिगंबरा... दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा अशा नामघोषात टाळ मृदुंग, झांज, घंटा, गजर व ब्रम्हवृंदांच्या एका सुरात म्हटलेल्या पदे व आरत्यांच्या निनादात आणि भाविकांच्या अपूर्व उत्साहात श्रींच्या (श्रीदत्ताच्या) पालखीचे शुक्‍लतीर्थाकडे आज (गुरुवार) दुपारी प्रस्थान झाले.

दत्त मंदिराच्या आवारात पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते पालखीला पुष्पार्पण केले. तत्पूर्वी पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी श्रींचे दर्शन घेतले. कन्यागत महापर्वकाळातील पालखी सोहळ्यामध्ये भाविक हजारोंच्या संख्यने उपस्थित होते. श्री गुरुदेव दत्त नाम घोषाच्या निनादाने आसमंत दुमदुमून निघाला. पालखी आकर्षक फुलांनी सजविण्यात आली होती. नैवद्य, धुप, दिप आरती होऊन दुपारी श्रींच्या पालखी सोहळ्यास ब्रम्हवृंद, ग्रमस्थ, दत्तभक्त व पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीत सुरुवात झाली. यावेळी माजी मंत्री आमदार डॉ. पतंगराव कदम, आमदार उल्हास पाटील, आमदार सुरेश हाळवणकर, आमदार सुजित मिणचेकर, वस्त्रोद्योग महामंडळाचे अध्यक्ष हिंदुराव शेळके, करवीर पिठाचे जगद्गुरु शंकराचार्य, गाणगापूर येथील वल्लभानंद महाराज, जिल्हाधिकारी डॉ. अमित सैनी, पोलीस अधीक्षक प्रदीप देशपांडे, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. कुणाल खेमणार, श्री नृसिंहसरस्वती दत्तगुरु देवस्थानचे अध्यक्ष राहूल पुजारी, सचिव संजय पुजारी तसेच मान्यवर ट्रस्टी, नृसिंहवाडी सरंपच अरुंधती जगदाळे, उपसरपंच धनाजीराव जगदाळे तसेच श्रींचे मान्यवर पुजारी आणि भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते. श्रींची पालखी परंपुज्य नारायण स्वामी मंदीरातून पंरपुज्य रामचंद्र योगी, स्वामी महाराज यांच्या मंदिराला प्रदक्षिणा करुन श्रींच्या पालखीचे प्रस्थान शुक्‍लतीर्थ घाटाकडे झाले.

पालखी मार्गावर वाडीच्या ग्रामस्थांनी, संस्कार भारतीने रांगोळ्या रेखाटल्या होत्या. पूर्ण पालखी मार्गावर मंडप घालण्यात आला आहे. ग्रामस्थ तसेच भाविकांनी विद्युत रोषणाईने आपली घर व पालखी मार्ग सजविला आहे. घरोघरी सुहासिनीनी श्रींचे औक्षण केले. पालखी मार्गावर महिला आणि भाविकांनी श्रींच्या पालखीवर पुष्पवृष्टी केली. या पालखी सोहळ्यास प्रांताधिकारी अश्विनी जिरंगे, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता सदाशिव साळुंखे, कार्यकारी अभियंता आर.एस.पाटील, तहसिलदार सचिन गिरी, गटविकास अधिकारी राहूल देसाई, श्री नृसिंहसरस्वती दत्त देवस्थानचे पदाधिकारी, ट्रस्टी, ग्रामपंचायत सदस्य, ग्रामस्थ आणि राज्यभरातून आलेले भाविक उपस्थित होते. पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी कन्यागत महापर्वकाल सोहळा शांततेत आणि उत्साहात संपन्न व्हावा यासाठी प्रशासनाने कार्यान्वित केलेल्या जिल्हा नियंत्रण कक्षास तसेच प्रसार माध्यमांसाठी तयार केलेल्या माध्यम कक्षास भेट देऊन केलेल्या उपाययोजनांची माहिती घेतली. जिल्हा नियोजन कक्षामधील सी.सी.टी.व्ही, नियंत्रण कक्ष आदींची माहिती घेऊन कन्यागत सोहळ्यासाठीच्या आपत्तकालीन यंत्रणेचा तसेच सुरक्षा यंत्रणेचाही आढावा घेतला. कन्यागत महापर्वकाल सोहळ्यानिमित्त श्रीक्षेत्र नृसिंहवाडी येथे करण्यात आलेल्या उपाययोजना विशेषत: विकास कामे यांचीही माहिती घेतली. पार्किंग, पालखी मार्ग, शुक्‍लतीर्थ घाट या ठिकाणी त्यांनी भेट देऊन केलेल्या उपाययोजनांची पाहणी करुन मार्गदर्शक सूचना केल्या. तसेच कृष्णा नदीला आलेल्या पाण्यामुळे निर्माण झालेल्या पुरपरिस्थितीची पाहणी करुन त्याबाबत केलेल्या उपाययोजनांचा त्यांनी आढावा घेतला.

Web Title: Shree's name Ghoshal palanquin suklatirthakade departure