लोकसेवा आयोगाच्या वनसेवा परिक्षेत श्रीकांत खांडेकर देशात तेहतिसावा

हुकूम मुलाणी 
गुरुवार, 7 फेब्रुवारी 2019

मंगळवेढा - सेवा केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या वन सेवा परिक्षेत देशात 33 व्या क्रमांकावर आलेल्या श्रीकांत खांडेकरच्या उच्च शिक्षणासाठी निरक्षर असलेल्या कष्ट करत वडीलांनी तीन एकर जमीन विकली. प्रसंगी व्याजाने पैसे काढून तिन्ही मुलाचे शिक्षणावर खर्च केले. परिस्थितीची जाणीव मुलांना करू दिली नाही. केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या वनसेवा परिक्षेत देशात 33 व महाराष्ट्रात 2 येण्याचा मान मुलाने मिळविला. स्पर्धा परिक्षेत मिळालेले यश हे वडीलांनी केलेल्या खर्च सार्थकी लावली आणि ग्रामीण भागातही चांगले अधिकारी घडू शकतात हे या निकालावरुन सिध्द झाले. 

दक्षिण भागात दुष्काळी तालुक्याच्या दक्षिण भागात असलेल्या बावची गावात जिरायत शेतीत केलेला खर्च परवडत नसल्याने मोलमजुरी करुन जगणाऱया बावची गावातील कुंडलिक खांडेकर यांनी आपल्या तीन मुलांना स्वता अशिक्षित राहून शिक्षीत केले. थोरल्या मुलाने मार्केटींगच्या माध्यमातून रोजगार मिळविला. दुसरा लोकसेवा आयोगाच्या परिक्षेत उत्तीर्ण झाला. तिसऱया मुलाचे पदवीचे शिक्षण सुरु आहे. बावचीच्या जिल्हा परिषद शाळेत शिक्षण झाल्यानंतर निंबोणी इंग्लीश स्कूलमध्ये माध्यमिक शिक्षण घेतल्यानंतर सोलापूरच्या दयानंद महाविदयातून बारावी विज्ञान शिक्षण झाले. दापोलीच्या कृषी विदयापीठात कृषी अभियांत्रीकीचे शिक्षण घेत असताना आयआयटीत निवड झालेली सोडून केंद्रीय लोकसेवा आयोगाची पुणे येथे 1 वर्षे तयारी नवी दिल्लीत सहा महिन्यापासून तयारी सुरु केली. 

पहिल्याच प्रयत्नात वनसेवा परिक्षेत देशात 33 वा क्रमांक मिळविला आणि 27 फे्रबुवारी भारतीय प्रशासन सेवेची मुलाखत होणार आहे. 10 वी पर्यंत मराठी माध्यमानंतर 11 वी विज्ञान शाखेत प्रवेश सुरुवातीला इंग्रजी विषयाशी संघर्ष करावा लागला. पण परिस्थितीची जाणीव आई वडीलांनी जाणवू दिली. त्याच्या प्रयत्नाने दुष्काळी बावची गावातून पहिला उच्चशिक्षीत अधिकारी होण्याचा मान मिळाला. या यशाबददल बोलताना श्रीकांत म्हणाला की, शहरी भागातील मुलाच्या परिस्थितीशी तुलना न करता आपले ध्येय समोर ठेवून तयारी केल्यास यश मिळू शकते. त्यासाठी प्रयत्न करावा असे आवाहन नवोदीत परीक्षार्थीना केले..

मुलांच्या यशाने आमचे कुटूंब सुखी झाले अजुनही रोजगाराने जात असून शिक्षणासाठी घेतलेल्या कर्जाचे व्याज आजही भरतोय कष्ट करतोय कुणाशी लबाडी केली नसल्याने मुलाने सार्थकी लावले कुंडलिक खांडेकर, बावची

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Shri Kant Khandekar of the Public Service Commission's Senior Service Examination