श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळ सामाजिक सन्मानासाठी ३ कोटी १७ लाखांची ठेव

akkalkoth
akkalkoth

अक्कलकोट - श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाकडून विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींचा सन्मान म्हणून अन्नछत्र मंडळाकडून ३ कोटी १७ लाखांची कायम ठेव ठेऊन त्या माध्यमातून येणार्‍या व्याजातून मदत करण्यात येणार असल्याची घोषणा संस्थापक अध्यक्ष जन्मेजय भोसले यांनी केली. कारंजा महल येथील निवासी कार्यालयात आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत सदरची घोषणा करण्यात आली.

यामध्ये सर्वाधिक ३५ लाख रुपयाची घोषणा इयत्ता १२ वी सह उच्चशिक्षित विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक मदतीसाठी तर अन्नछत्र मंडळाच्या सेवेकर्‍यांच्या पाल्यांच्या शैक्षणिक मदतीसाठी १५ लाख, अन्नछत्र मंडळासाठी योगदान देणार्‍या व मंडळाच्या क्रियाशिल सभासदांच्या पाल्यांच्या शैक्षणिक व वैद्यकीय मदती करीता २५ लाख, शहरातील शैक्षणिक संस्था, विद्यार्थ्यांना शालेय सुविधा करिता २५ लाख, विकासात्मक दृष्टीकोनाच्या वार्तांकन करणाऱ्या पत्रकारास १० लाख, वृत्तपत्र विक्रेत्यांच्या पाल्यांच्या शैक्षणिक मदतीसाठी रूपय ७ लाख ५० हजार,याबरोबरच वृत्तपत्र वार्ताहार यांच्या पाल्यांसाठी रुपय ७ लाख ५० हजार, देशी विदेशी क्रिडा साहित्य १० लाख, धर्मांदाय नोंद झालेल्या मंडळाच्या उत्सवा करिता २५ लाख, वृक्षारोपण, वृक्षसंवर्धन करिता ११ लाख, जल संवर्धना करिता ११ लाख, बेटी बचाव बेटी पढाव ९ लाख, आदर्श गृहणी ११ लाख, तर समाज प्रबोधन करणार्‍या शहर व तालुक्यातील भजनी मंडळांना उत्तेजनार्थ, आदर्श शेतकरी शेतीनिष्ठ, सेंद्रिय शेतीवर भर, लोकोपयोगी सेवा पुरविणारे, सामाजिक बांधिलकी जपत गोरगरीबांना न्याय मिळवून देणारे विधिज्ञ, आदर्श शिक्षक, आदर्श महसूल कर्मचारी, आदर्श पोलीस कर्मचारी, आदर्श शिक्षकेत्तर कर्मचारी, आदर्श राज्य परिवहन मंडळाचे कर्मचारी, आदर्श वीज कर्मचारी, शहर व तालुक्यातील दुर्बल उपेक्षित व गोरगरीबांना मदत करणारे समाजसेवक, आदर्श पोष्ट कर्मचारी, आदर्श आरोग्य कर्मचारी, व्यापार दिन करणारे व्यावसायीक, आदर्श सामाजिक संस्था, २ ते ५ वयातील सदृढ बालक, उद्योन्मुख उद्योजक, आदर्श बँकींग सेवा, आदर्श नगर पालिका कर्मचारी अशा १९ घटकांकरिता ५ लाखांची कायम ठेव ठेवण्यात आली असल्याचे माहिती जन्मेजय भोसले यांनी दिली. 

या पत्रकार परिषदेस मुख्याधिकारी डॉ. प्रदीप ठेंगल,पोलीस निरीक्षक भगवानराव निंबाळकर, उपनगराध्यक्ष यशवंत धोंगडे, महेश हिंडोळे, अशपाक बळोरगी, उपाध्यक्ष अभय खोबरे, सचिव शाम मोरे, मंडळाचे कार्यकारी विश्‍वस्त अमोल भोसले, महेश इंगळे, जनसंपर्क अधिकारी बाबासाहेब निंबाळकर, प्रविण देशमुख, विश्‍वस्त लक्ष्मण पाटील, संतोष भोसले, एस.के. स्वामी, महांतेश स्वामी, मुन्ना कोल्हे, दत्ता माने, राजू पवार, शहाजी यादव, सिध्दाराम कल्याणी, प्रकाश गायकवाड, बाळा पौळ, विश्वनाथ हडलगी, बाळासाहेब घाडगे,सुनील खवळे, काशीनाथ घोडके,विठ्ठल तेली, प्रकाश सोनटक्के, अरविंद शिंदे, अप्पू कोरे, विजय मानकर, संतोष तोळणूरे आदींची उपस्थिती होती.

जन्मेजयराजे भोसले महाराज हे श्री स्वामी समर्थ मंडळाचे संस्थापक झाले. सर्व ज्ञात आहेच. त्यांनी संघर्षातून मंडळास शुन्यातून विश्‍व निर्माण करण्याची ताकद ‘श्री’ नी दिली. त्यामुळेच आज वटवृक्षात रुपांतर झालेल्या अन्नछत्र मंडळाच्या माध्यमातून भक्तांबरोबरच एक सामाजिक सेवेचे व्रत म्हणून विविध क्षेत्राकरिता कायम ठेव ठेवून त्यांनी त्या व्याजातून होणारी मदत ही आमच्या करिता श्रींचा प्रसादच आहे. दसर्‍याच्या मुहूर्तावर घेतलेल्या निर्णयाचे स्वागत !
मलिकार्जून कोरे - अध्यक्ष अक्कलकोट तालुका वृत्तपत्र विक्रेते संघटना

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com