सासुच्या निधनानंतर सुनेची आत्महत्या नव्हे तर पतीकडून खून 

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 13 मार्च 2019

कोल्हापूर - सासूच्या निधनाच्या धक्‍क्‍याने सुनेने आत्महत्या केल्याचे भासवून खुनाचा प्रकार दडपण्याचा प्रयत्न करणाऱ्या पतीचा जुना राजवाडा पोलिसांनी पर्दाफाश केला. आईच्या निधनानंतर पतीने पत्नीला इमारतीवरून ढकलुन दिले.

कोल्हापूर - सासूच्या निधनाच्या धक्‍क्‍याने सुनेने आत्महत्या केल्याचे भासवून खुनाचा प्रकार दडपण्याचा प्रयत्न करणाऱ्या पतीचा जुना राजवाडा पोलिसांनी पर्दाफाश केला. आईच्या निधनानंतर पतीने पत्नीला इमारतीवरून ढकलुन दिले. त्यानंतर तिच्या डोक्‍यात फरशी घालून तिचा खून केला, अशी कबुली पती संदीप लोखंडे याने पोलिसांसमोर दिली. त्याला पोलिसांनी अटक केली आहे. त्याचे वडील मधुकर लोखंडे यांनाही चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे. 

आपटेनगर परिसरात राहणारे लोखंडे परिवारातील मालती लोखंडे यांचे शनिवारी पहाटे निधन झाले. या निधनाच्या धक्‍क्‍याने सुन शुभांगी लोखंडे अस्वस्थ झाली. देवघरातून त्यांनी आंगारा आणला. त्यानंतर तो आंगारा सासुला लावला पण त्यानंतर प्रतिसाद मिळाला नाही. त्यामुळे सासुच्या निधनाचा धक्का सहन न झाल्याने शुभांगी लोखंडे यांनी दुसऱ्या मजल्यावरून उडी घेऊन आत्महत्या केली. असा बनाव पती संदीप लोखंडे यांने केला. तपास व नोंदवलेल्या जबाबानुसार पोलिसांची शंका बळावली. ही आत्महत्या नसुन घातपाताचा प्रकार या दृष्टीने पोलिसांनी तपास सुरू केला.

आज सकाळी मुलगा शिवतेज दहावीच्या परिक्षेसाठी शाळेत आला होता. त्यावेळी त्याला पोलिसांनी ताब्यात घेतले. चौकशीत त्यांनी आईच्या निधनानंतर पत्नीने व्यक्त केलेल्या चेहऱ्यावरील हावभाव पाहून संदीप संतप्त झाला. त्याने ती केर काढत असताना तिला इमारतीच्या पहिल्या मजल्यावरून उचलून फेकून दिले. त्यात ती गंभीर जखमी झाली. त्यानंतर खाली जाऊन डोक्‍यात फरशी घातली. त्यातच तिचा मृत्यू झाला. त्यानंतर तिने आत्महत्या केल्याचा बनाव केल्याची कबुली संदीपने पोलिसांसमोर दिली. शहर पोलिस अधिक्षक प्रेरणा कट्टे व नुतन पोलिस निरीक्षक प्रमोद जाधव यांनी या घटनेचा यशस्वी तपास केला.

Web Title: Shubhangi Lokhande not suicide, her husband done Murder