धावणा-या, पळणा-या वैद्यकीयनगरीत शुकशूकाट

शंकर भोसले
Friday, 24 July 2020

कोरोनाचा धोका ओळखून जिल्हा प्रशासनाकडून लागू करण्यात आलेल्या लॉकडाऊनला मिरजकरांचा चांगला प्रतिसाद मिळाला.

मिरज : कोरोनाचा धोका ओळखून जिल्हा प्रशासनाकडून लागू करण्यात आलेल्या लॉकडाऊनला मिरजकरांचा चांगला प्रतिसाद मिळाला. एरवी धावणारी, पळणारी असलेली मिरज वैद्यकीयनगरीत आज सर्वत्र शुकशूकाट पसरला होता. आज लॉकडाऊन काळात नागरिकांनी घराबाहेर न पडता पोलिस, प्रशासनास पुर्ण सहकार्य केल्यामुळे प्रशासनावरील ताण हलका झाला. शहरातील औषधालये, रूग्णालये वगळता सर्वत्र शुकशूकाट होता. एरवी गर्दीने गजबजलेला मार्केट परिसर दुस-या लॉकडाऊनमध्ये निर्मनुष्य होता. 

मिरजीेची लोकसंख्या पाहता अपु-या पोलिस यंत्रणेस गृहरक्षक दलाची देखील मदत झाली. शहरात प्रवेश करणा-या दिंडीवेस, गाडवे चौक, दत्त चौक, सराफ कट्टा, शास्त्री चौक, मिशन चौक, पंढरपूर रोड, सांगली रोड या ठिकाणी तपासणी नाके करून प्रत्येक वाहनधारकांची चौकशी करण्यात येत होती. शहरात लॉकडाऊनला नागरिकांचा चांगला प्रतिसाद मिळाला. तरी विनाकारण फिरणा-यांना पोलिसांनी लाठीचा प्रसाद देत आवर घातला. 

सध्या मिरजेतील कोरोना बाधितांचा 131 हा आकडा भयावह आहे. बाधितपैकी 11 जणांचा मृत्यू झाला आहे. बहुतांश पन्नाशी पार नागरिकांचा समावेश आहे. वैद्यकीयनगरीत उपचारासाठी आलेल्यांकडून कर्मचा-यांना लागण झाल्यामुळे बाधितांचा आकडा वाढत गेला. आज लागू लॉकडाऊनला नागरिकांचा शंभर टक्के प्रतिसाद मिळाला. 

पुर्वभागात चोख बंदोबस्त 
मिरज पुर्व भागातील मालगाव, सुभाषनगर, म्हैसाळ, एरंडोली, भोसे, सोनीसह प्रमुख गावात ग्रामीण पोलिसांकडून चोख बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. ध्वनिक्षेपकाद्वारे नागरिकांना घराबाहेर न पडण्याचे आवाहन करण्यात येत होते. कंटेनमेंट झोनमधील नागरिकांनी विशेष दक्षता घेत घरीच राहण्याचे आवाहन ग्रामपंचायतीकडून करण्यात येत होते. 

 

संपादन : प्रफुल्ल सुतार

सांगली

सांगली


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Shukshukat in the running, running medical city