Photo : सिद्धेश्‍वर यात्रेतील मुख्य सोहळ्यास प्रारंभ

प्रशांत देशपांडे 
Monday, 13 January 2020

सोमवारी सकाळी ‘एकदा भक्तलिंग हर्र बोला.. हर्र...’च्या जयघोषात सातही नंदीध्वज ६८ लिंगांना तैलाभिषेकासाठी  मार्गस्थ झाले. यावेळी महापौर श्रीकांचना यन्नम, माजी केंद्रीय मंत्री सुशीलकुमार शिंदे, आमदार प्रणिती शिंदे, माजी आमदार सिद्धाराम चाकोते, माजी आमदार विश्‍वनाथ चाकोते, माजी आमदार शिवशरण पाटील, सिद्धेश्‍वर मंदिर समितीचे अध्यक्ष धर्मराज काडादी, यात्रा कमिटीचे अध्यक्ष बाळासाहेब पटणे, पोलिस आयुक्त अंकुश शिंदे आदी उपस्थित होते.

सोलापूर : सोलापुरातील सर्वात मोठी समजल्या जाणाऱ्या सिद्धेश्‍वर यात्रेतील मुख्य धार्मिक कार्यक्रमांना सोमवारी (ता. १३) सकाळी तैलाभिषकाने सुरवात झाली. सकाळी आठ वाजता हिरेहब्बू वाड्यात यात्रेतील प्रमुख मानकरी राजशेखर हिरेहब्बू व सोमशंकर देशमुख, सुदेश देशमुख, आमदार विजयकुमार देशमुख यांच्या हस्ते पहिल्या व दुसऱ्या मानाच्या नंदीध्वजाचे पूजन झाले.

Image may contain: 13 people, people smiling, people standing

यावेळी महापौर श्रीकांचना यन्नम, माजी केंद्रीय मंत्री सुशीलकुमार शिंदे, आमदार प्रणिती शिंदे, माजी आमदार सिद्धाराम चाकोते, माजी आमदार विश्‍वनाथ चाकोते, माजी आमदार शिवशरण पाटील, सिद्धेश्‍वर मंदिर समितीचे अध्यक्ष धर्मराज काडादी, यात्रा कमिटीचे अध्यक्ष बाळासाहेब पटणे, पोलिस आयुक्त अंकुश शिंदे आदी उपस्थित होते. सोमवारी सकाळी ‘एकदा भक्तलिंग हर्र बोला.. हर्र...’च्या जयघोषात सातही नंदीध्वज ६८ लिंगांना तैलाभिषेकासाठी  मार्गस्थ झाले.  

Image may contain: 12 people, including Ravindra Deshmukh, people smiling, people standing, crowd and outdoor

रविवारी मध्यरात्री पहिल्या व दुसऱ्या नंदीध्वजांना साज चढवण्यात आली. यामध्ये काठीला हळद व चंदनाचा लेप लावून अंघोळ घालण्यात आली. त्याला घोंगडी, हर्डे, खेळणे आदी साजशृंगार करण्यात आला. सोमवारी सकाळी उत्साही व भक्तिमय वातावरणात धार्मीक विधींना प्रारंभ झाला. पहाटे सहापासून भक्तांची पावले हिरेहब्बू यांच्या घराकडे वळू लागली. जशी मिरवणुकीची वेळ जवळ येत होती, तसा उत्साहही वाढल्याचे भक्तांच्या हावभावावरून दिसत होते. सुरवातीला हलगी, ताशा, बँड पथक, भजनी मंडळ, संबळ वादकांनी सिद्धेश्‍वर महाराजांच्या विविध गाणी सादर केली.

Image may contain: 2 people, people smiling, crowd and outdoor

सुरवातीला सिद्धेश्‍वर महाराजांची पालखी मार्गस्थ झाली. ही पालखी धोत्री गावातील गावकऱ्यांनी वाहिली. त्यांच्या मागे यात्रेतील प्रमुख मानकरी सागर हिरेहब्बू सिद्धेश्वर महाराजांच्या हातातील योगदंड घेऊन मार्गस्थ झाले. त्यानंतर सातही नंदीध्वज सिद्धेश्वर मंदिराकडे एकापाठोपाठ मार्गस्थ झाले. हिरेहब्बू वाड्यापासून निघून हे नंदीध्वज दाते गणपतीपासून दत्त चौक, सोन्या मारुती, माणिक चौक, विजापूर वेस मार्गे मंदिरात पोचणार आहे. हिरेहब्बू वाड्यापासून निघाल्यावर नंदीध्वजांची भक्तांकडून अनेक ठिकाणी खोबरे, लिंबू, खारीक यांचे हार अर्पण करून नंदीध्वजाची मनोभावे पूजा करण्यात आली.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: The Siddheshwar yatra main event of the begins