सिध्देश्वर महाराजांच्या यात्रेस शनिवारपासून प्रारंभ

राजकुमार शहा
गुरुवार, 29 मार्च 2018

यात्रेची सुरवात गावातील विविध समाजाच्या नागरिकांकडून मंडप उभारणीने होते. यात्रा कालावधीत सिद्धेश्वरांचा छबीना विविध सोंगे व अन्य धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन केले जाते. तर येणाऱ्या भाविकांना ग्रामपंचायतीच्या वतीने पिण्याच्या पाण्यासह अन्य सोयीसुविधा उपलब्ध करून दिल्या जातात. शांतता कमेटीच्या बैठकीस बाळासो भांगे, शाहु खडके, उपसरपंच दतात्रय वागज, राजाराम भांगे, पोलिस पाटील विजय भांगे, अंकुश वागज, संजय शेळके, दत्तात्रय कोळी आदीसह ग्रामस्थ मोठया संखेने उपस्थीत होते.  

मोहोळ : शेटफळ (ता. मोहोळ) येथील व पंचक्रोशीत प्रसिद्ध असलेल्या ग्रामदैवत सिध्देश्वर महाराजांच्या यात्रेस येत्या शनिवारपासून प्रारंभ होत असून आठवडाभर चालणाऱ्या या यात्रेची सुरवातच सीसीटीव्ही कॅमेरे बसवुन होणार असुन यात्रा कालावधीत भाविकांना यात्रेचा आनंद घेता यावा यासाठी मोठा पोलिस बंदोबस्त तैनात केल्याची माहिती पोलिस निरीक्षक राजेंद्र मस्के यांनी दिली.

चैत्र पौर्णिमेपासून सुरु होणाऱ्या या यात्रेच्या पार्श्वभूमीवर शेटफळ येथे शांतता समितीची बैठक आयोजित केली होती. त्यावेळी मस्के ग्रामस्थांशी संवाद साधत होते यावेळी सिध्देश्वर पंचकमेटीचे सदस्य व ग्रामस्थ मोठ्या संखेने उपस्थित होते. यावेळी मस्के यांनी ग्रामस्थांना शांततेचे आवाहन केले. सीसीटीव्ही बसविण्याची सुरवात सिध्देश्वर मंदीर परिसर ग्रामपंचायत कार्यालय कै. शामराव भांगे चौक विजयराज डोंगरे चौक भैया चौक शेटफळ चौक या ठिकाणावरुन होणार असुन या कॅमेऱ्यांचे नियंत्रण व क्षणचित्रे शेटफळ पोलिस औट पोष्ट या ठिकाणी संकलित केले जाणार असुन त्यांचे यांत्रिक नियोजन गोपनीय विभागाचे हवलदार निलेश देशमुख करणार आहेत. लोकवर्गणीतुन कॅमेऱ्यासाठी नागरीकांनी सहकार्य करण्याचे आवाहन यावेळी पोलिस विभागाच्या वतीने करण्यात आले.

यात्रेची सुरवात गावातील विविध समाजाच्या नागरिकांकडून मंडप उभारणीने होते. यात्रा कालावधीत सिद्धेश्वरांचा छबीना विविध सोंगे व अन्य धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन केले जाते. तर येणाऱ्या भाविकांना ग्रामपंचायतीच्या वतीने पिण्याच्या पाण्यासह अन्य सोयीसुविधा उपलब्ध करून दिल्या जातात. शांतता कमेटीच्या बैठकीस बाळासो भांगे, शाहु खडके, उपसरपंच दतात्रय वागज, राजाराम भांगे, पोलिस पाटील विजय भांगे, अंकुश वागज, संजय शेळके, दत्तात्रय कोळी आदीसह ग्रामस्थ मोठया संखेने उपस्थीत होते.  

असा आहे पोलिस बंदोबस्त    
पोलिस कर्मचारी     25 
अधिकारी              4 
शिघ्रकृतीदल तुकड्या   2 
साध्या वेषातील पोलिस   5 
या शिवाय महत्वाच्या ठिकाणी बॅरेगेटींग केले जाणार आहे नागरीकांनी सहकार्य करण्याचे आवाहन देवस्थान पंचकमेटी व पोलिसांनी केले आहे

Web Title: Siddheshwar yatra in Mohol