नीरा डाव्या कालव्यातून पाणी चोरी करणारी सायफन काढली

राजकुमार थोरात
बुधवार, 12 डिसेंबर 2018

वालचंदनगर - पाटबंधारे विभागाने इंदापूर तालुक्याच्या पश्‍चिम भागातील नीरा डाव्या कालव्यातील बेकायदेशीर सायफन जेसीबी यंत्राच्या साहय्याने काढून टाकली. 

वालचंदनगर - पाटबंधारे विभागाने इंदापूर तालुक्याच्या पश्‍चिम भागातील नीरा डाव्या कालव्यातील बेकायदेशीर सायफन जेसीबी यंत्राच्या साहय्याने काढून टाकली. 

इंदापूर तालुक्याच्या पश्‍चिम भागामध्ये नीरा डाव्या कालव्यामधून अनेक सायफन धारक बेसुमार पाण्याची चोरी करीत होते. सायफनद्वारे शेतकरी कालव्यातुन पाण्याची चोरी करुन विहिरीमध्ये सोडत असतात. व विहिरीतील पाणी पाइपलाईनद्वारे शेततळी व शेतामध्ये सोडण्याचा सपाटा शेतकऱ्यांनी लावला होता. सायफनद्वारे पाणी चोरी झाल्यामुळे अनेक शेतकऱ्यांच्या हक्काचे पाणी मिळण्यास विलंब होतो. व यामुळे दरवर्षी हजारो एकर पिके जळाल्याच्या घटना घडल्या आहेत. १५ डिसेंबरच्या सुमारास नीरा डाव्या कालव्याला पाणी येणार असून हे सुरवातीला शेटफळ तलावामध्ये जाणार आहे. नंतर रब्बीच्या आवर्तनास सुरवात होणार आहे. पाणी चोरी रोखण्यासाठी पाटबंधारे विभागाने आत्तापासुन कंबर कसली असून सायफन काढण्याचा सपाटा लावला आहे.

तालुक्याच्या पश्‍चिम भागातील बोरी, लासुर्णे, जंक्शन, भरणेवाडी, अंथुर्णे या परीसरातुन सुमारे ७५ सायफन काढण्यात आली. कारवाईमध्ये अंथुर्णे विभागाचे शाखाधिकारी श्‍यामराव भोसले, कालवा निरीक्षक दत्तात्रेय काळे, दिनेश वाघ,सहाय्यक पांडुरंग वाघमोडे, मिथुन कांबळे यांनी यांनी सहभाग घेतला.

फौजदारी कारवाई करण्याचा इशारा...
यासंदर्भात शाखाधिकारी श्‍यायमराव भोसले यांनी सांगितले की, अनाधिकृत सायफन द्वारे पाणी चोरी करणाऱ्या शेतकऱ्यांचे सायफन फोडण्यात आली असून संबंधित शेतकऱ्यांना २५ हजार रुपये दंड तातडीने भरण्याच्या नोटिस देण्यात आल्या आहेत. पुन्हा पाणी चोरी केल्यास फौजदारी कारवाई करण्याचा इशारा दिला असल्याचे सांगितले. 

Web Title: Sieffan removed stealing water from the nira left canal