सिग्नल यंत्रणेचे वाजले तीन तेरा

शंकर भोसले
रविवार, 6 मे 2018

मिरज - शहरात मुख्य चौकांतील सिग्नल यंत्रणेचे तीन तेरा वाजले आहेत. गेली कित्येक वर्षे शहरातील सिग्नल यंत्रणा बंद आहे. शहरातील महात्मा गांधी चौक, स्टेशन चौक, श्रीकांत चौक येथील सिग्नल बंद अवस्थेत आहेत. 

मार्केट परिसरातील श्रीकांत चौकात सौरउर्जेवर चालणारी सिग्नल यंत्रणा प्रारंभापासून फक्त सहा महिने कार्यान्वित राहिली आहे. शिवाय, महात्मा गांधी चौकातून रोज पंढरपूर व सोलापूर येथून शेकडो वाहनांची ये-जा होत असते. मात्र, सिग्नलअभावी येथे वाहतुकीची कोंडी होते.

शहरात सिग्नल यंत्रणाच बंद अवस्थेत असल्याने वाहतूक पोलिसांना शिटी वाजवून व हातवारे करूनच वाहतूक नियंत्रण करावे लागते.

स्टेशन चौक हा बसस्थानक, स्टेशन, दवाखाने असणारा परिसर आहे. या ठिकाणी पोलिसांची वाहतूक नियंत्रणासाठी चांगलीच तारांबळ उडताना दिसते. तसेच शाहू चौक अनेक विचित्र मार्गांनी छेदलेला चौक आहे. या चौकात वारंवार अनेक अपघात होत असतात. येथे सुरक्षेसाठी कोणतेही गतिरोधक किंवा सिग्नल व्यवस्था नाही. शिवाय, वाहतूक पोलिसांचा अभाव आहे. परिणामी, या ठिकाणी रोज एक असे नित्य अपघात होत आहेत.

शहरातील वाहतूक शाखेने सिग्नल यंत्रणा कार्यान्वित करण्यासंदर्भात महापालिकेशी अनेकदा पत्रव्यवहार केला आहे. मात्र, महापालिका याबाबत कोणत्याच प्रकारची हालचाल करीत नसल्याचे दिसत आहे.

शहरात गेली अनेक वर्षे सिग्नल यंत्रणा बंद आहे. बेशिस्त वाहतूक सुरू आहे. शिवाय, सुसाट वाहनधारकांची संख्या वाढली आहे.
- युवराज हुलवान, दुचाकीस्वार, मिरज

अनेक अपघातांचा केंद्रबिंदू असलेल्या शाहू चौकात सुरक्षेसाठी सिग्नल यंत्रणा बसविणे गरजेचे आहे. मात्र, शहरातील अन्य ठिकाणच्या सिग्नल व्यवस्थेकडे महापालिका व वाहतूक शाखेचे दुर्लक्ष झाल्याचे दिसते. 
- सुनील लवंद, नागरिक, मिरज

Web Title: signal system problem