मुस्लिम आरक्षणासाठी स्वाक्षरी मोहीम

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 18 डिसेंबर 2016

सांगली - महाराष्ट्रातील मुस्लिम समाजाचा आर्थिक, सामाजिक स्तर खालावलेला आहे. त्यामुळे मुस्लिम समाजाला आरक्षण द्यावे, या मागणीसाठी आज महाराष्ट्रीयन मुस्लिम आरक्षण आंदोलनाच्या वतीने स्टेशन चौकात धरणे आंदोलन करून स्वाक्षरी मोहीम राबवण्यात आली.

राज्यातील ९० टक्के मुस्लिम जनता बहुतांश ग्रामीण भागात आणि शहरी भागातील अविकसित क्षेत्रात राहते. मुस्लिम समाजात शिक्षणाचे प्रमाण अवघे ४ ते ६ टक्के आहे. मुस्लिम समाजाचे पारंपरिक व्यवसाय डबघाईला आलेले आहेत. त्यामुळे समाजाचा शैक्षणिक, सामाजिक स्तर खालावलेला आहे. सन २०१४ मध्ये शासनाने अध्यादेश काढून मागासलेल्या मुस्लिम समाजाचा विशेष प्रवर्ग ‘अ’ बनवून ५ टक्के आरक्षण प्रदान केले होते; परंतु या अध्यादेशाचे कायद्यात रूपांतर न झाल्याने तो आता कालबाह्य ठरला आहे. आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यामध्ये लक्ष घालून मुस्लिम समाजाला आरक्षण मिळवून द्यावे, अशी मागणी करण्यात आली आहे.

मुनीर मुल्ला, दाऊद मुजावर, साजीद मुजावर, आसिफ मुजावर, साजीद शेख, फैरोजा पटेल, आर्शिया पटेल आदींनी आंदोलनात भाग घेतला.

Web Title: signature campaign for muslim reservation