बेळगाव रेल्वे स्थानकाला छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव देण्यासाठी स्वाक्षरी मोहीम

महाराष्ट्र एकीकरण युवा समितीतर्फे शिवजयंतीच्या निमित्ताने स्वाक्षरी मोहिमेच्या जनजागृतीला सुरुवात
Signature campaign to name Belgaum railway station Chhatrapati Shivaji Maharaj
Signature campaign to name Belgaum railway station Chhatrapati Shivaji Maharajsakal

बेळगाव : बेळगाव रेल्वे स्थानकाला छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव द्यावे या मागणीसाठी महाराष्ट्र एकीकरण युवा समितीतर्फे स्वाक्षरी मोहीम हाती घेण्यात आली आहे. शिवजयंतीच्या निमित्ताने स्वाक्षरी मोहिमेच्या जनजागृतीला सुरुवात करण्यात आली आहे. नरगुंदकर भावे चौक येथील मध्यवर्ती सार्वजनिक शिवजयंती उत्सव महामंडळाच्या मंडपामध्ये मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीचे अध्यक्ष दीपक दळवी व इतर कार्यकर्त्यांच्या हस्ते जनजागृती मोहीमेस सुरुवात करण्यात आली. काही दिवसांपूर्वी युवा समितीच्या कार्यकर्त्यांनी रेल्वे विभागाच्या अधिकाऱ्यांना निवेदन देऊन बेळगाव रेल्वे स्थानकाला शिवाजी महाराजांचे नाव द्यावे अशी मागणी केली होती.

त्यानंतर आता स्वाक्षरी मोहीम हाती घेऊन नाव देण्यासाठी जनजागृती करण्यास सुरुवात केली असून यासाठी पत्रकांचे वितरण केले जात आहे. तसेच जास्तीत जास्त लोकांनी या मोहिमेत सहभाग घ्यावा असे आवाहन करण्यात येत आहे. छत्रपति शिवाजी महाराज हे संपुर्ण देशाची ओळख बनलेल्या मराठा लाईट इन्फंट्री या सैन्य दलाचे सुद्धा आराध्य व आदर्श आहेत. मराठा लाईट इन्फंट्रीने आत्तापर्यंत अतुलनीय शौर्य गाजवले आहे या इन्फंट्रीतील सैन्यदल शिवाजी राजांचा आदर्श घेऊन लढत आले आहे. त्यांची युद्धगर्जना सुद्धा बोला छत्रपती शिवाजी महाराज कि जय अशी आहे. १९२२ मध्ये मराठा लाईट इन्फंट्री चे मुख्यालय बेळगाव येथे स्थापन करण्यात आले होते त्याला शंभर वर्षे पूर्ण होत आहेत.

या शताब्दी वर्षाचे औचित्य साधून शिवाजीराजांचा गौरव करण्यासाठी नूतनीकरण करण्यात आलेल्या बेळगाव रेल्वे स्थानकाला शिवाजी महाराज रेल्वे स्थानक नाव द्या अशी मागणी स्वाक्षरी मोहिमेद्वारे करण्यात येत आहे. यावेळी माजी महापौर सरिता पाटिल, माजी उपमहापौर रेणू किल्लेकर, शिवसेना जिल्हा प्रमुख प्रकाश शिरोळकर, युवा समिती अध्यक्ष शुभम शेळके, विलास कलघटगी, अंकुश केसरकर, महादेव पाटील, नगरसेवक शिवाजी मंडोळकर, संभाजी शिंदे, गणेश दडीकर, बाबू कोले आदी कार्यकर्ते उपस्थित होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com