esakal | सांगलीत सह्यांची मोहीम : महिला काँग्रेसच्या पदाधिकारी व कार्यकर्त्या रस्त्यावर
sakal

बोलून बातमी शोधा

सांगलीत महिला काँग्रेसच्या पदाधिकारी व कार्यकर्त्या रस्त्यावर

सांगलीत महिला काँग्रेसच्या पदाधिकारी व कार्यकर्त्या रस्त्यावर

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

सांगली : इंधन दरवाढ व महागाईच्या विरोधात आज महिला काँग्रेसच्या पदाधिकारी व कार्यकर्त्या रस्त्यावर उतरल्याचे चित्र दिसले. केंद्र सरकारच्या विरोधात पेट्रोल पंपावर जोरदार निदर्शने करण्यात आली. तसेच सह्यांची मोहीम राबवण्यात आली.

महाराष्‍ट्र प्रदेश काँग्रेसचे अध्‍यक्ष नाना पटोले व प्रदेश महिला काँग्रेसच्‍या अध्‍यक्षा संध्‍या सव्‍वालाखे यांच्‍या मार्गदर्शक सूचनेनुसार प्रदेश काँग्रेसच्या उपाध्यक्षा श्रीमती शैलजा पाटील यांच्या नेतृत्वाखाली आज आंदोलन झाले. त्या म्हणाल्या, ‘‘सरकारच्‍या मागील सात वर्षांच्‍या काळात महागाईने सर्वसामान्‍य लोकांचे जगणे मुश्‍कील झाले आहे. स्‍वयंपाक गॅस, खाद्यतेल, पेट्रोल, डिझेल यांच्‍या किमती तत्‍काळ केंद्र सरकारने कमी कराव्‍यात, अन्‍यथा फार मोठा कठीण काळ येईल.’’ (signature-campaign-women-congress-party-worker-gas-oil-petrol-diesel-high-price-sangli-news)

दरम्यान, महिला काँग्रेसच्या‍ वतीने पेट्रोल पंपासमोर केंद्र सरकारच्या विरोधात जोरदार निदर्शने करण्यात आली. केंद्रातील मोदी सरकारच्‍या मनमानी कारभाराविरोधात घोषणाबाजी करण्यात आली. इंधन दरवाढीविरोधात ग्राहकांची सह्यांची मोहीम सुरू केली. तसेच जिल्‍हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांना मागण्यांचे निवेदन देण्‍यात आले. निवेदनात म्हटले आहे, आंतरराष्‍ट्रीय बाजारात कच्च्‍या तेलाचे कमी असताना केंद्रसरकार भरमसाट कर लावून लूट करत आहे.

पेट्रोल, डिझेलवर १८ रुपये रस्‍‍ते विकास सेस व ४ रुपये कृषी सेसच्‍या माध्‍यमातून घेतले जातात. डिझेलवर ८२० टक्‍के, तर पेट्रोलवर २५८ टक्‍के एक्‍साईज ड्यूटी लावली आहे. पेट्रोल-डिझेलवरील करामधून ७ वर्षांत तब्‍बल २२ लाख कोटी रुपयांची नफेखोरी केली. भरमसाट करामुळेच पेट्रोलचे दर १०६ रुपये, तर डिझेलचा दर ९६ रुपये लिटर झाला आहे. गॅस सिलिंडर सुद्धा ८५० रुपयां‍यावर गेले आहे. डिझेल महाग झाल्‍याने सार्वजनिक तसेच मालवाहतूकही महागली आहे. खाद्यतेलही महागले आहे. डाळींचे भावही प्रचंड वाढलेत. लोकांच्‍या हाताला काम नाही, तर दुसरीकडे प्रचंड महागाई या दुष्‍टचक्रात सामान्य आणि मध्‍यमवर्गही भरडला आहे.

हेही वाचा- दूध उत्पादकांना Good News : गोकुळ दूध संघाच्या खरेदी दरात मोठी वाढ

आंदोलनात मालन मोहिते, नगरसेविका शुभांगी साळुंखे, आरती वळ‍वडे, मदिना बारुदवाले, शैलजा पाटील-पद्माळेकर, आशा पाटील, क्रांती कदम, अर्चना शेंडगे, मायाताई आरगे, जन्‍नत नायकवडी, शमशद नायकवडी, करुणा सॅमसन, आरती गुरव, अर्चना कबाडे, सविता आबदारे आदी पदाधिकारी व कार्यकर्त्या उपस्थित होत्‍या.

loading image