कोल्हापूर : पट्टणकोडोलीतील श्री विठ्ठल बिरदेवसाठी चांदीची पालखी 

कोल्हापूर : पट्टणकोडोलीतील श्री विठ्ठल बिरदेवसाठी चांदीची पालखी 
कोल्हापूर : पट्टणकोडोलीतील श्री विठ्ठल बिरदेवसाठी चांदीची पालखी 

पट्टणकोडोली - येथील श्री विठ्ठल बिरदेव व देवी भागीरथीसाठी भाविकांच्या देणगीतून साकारलेली चांदीची पालखी आज मंदिरात आणण्यात आली. तब्बल ३३ किलो चांदी ही पालखी तयार करण्यासाठी लागली आहे. 

पाच राज्यांत प्रसिद्ध असणाऱ्या विठ्ठल बिरदेवाचे आगळे वेगळे महत्त्व आहे. 1970 साली बनवण्यात आलेल्या लाकडी पालखीतूनच देवाची मिरवणूक निघत होती. धनगर समाजाने देवासाठी चांदीची पालखी बनवण्याचा एक वर्षा पूर्वी संकल्प केला होता. हा संकल्प मंदिरात जाहीर करताच अनेक भाविक भक्तांनी मंदिरात येऊन या चांदीच्या पालखीसाठी देणगी दिली होती. तसेच समाजाच्या पंचमंडळींनी ही भागातील अनेक चांदी उद्योजकांची भेट घेऊन मदतीसाठी आव्हान केले होते. त्यानुसार पालखीसाठी देणगी दिली होती. सर्व भक्तांच्या मदतीतूनच या पालखीची निर्मिती करण्यात आली. 

अशी आहे चांदीची पालखी..

या पालखीसाठी तब्बल 33 किलो चांदी लागली असून 22 गेज चांदीचा पत्रा वापरण्यात आला. हुपरी येथील चांदी उद्योजक अशोक माळी व त्यांचे चिरंजीव आशीष माळी यांनी पाच कारागिरांच्या मदतीने या पालखीचे काम पूर्ण केले. यासाठी रोज आठ तास हे कारागीर काम करीत होते. तब्बल दीड महिने या पालखीच्या पूर्णत्वासाठी लागले. या पालखीमध्ये पाच फड्यांचा नाग, मोराची दर्जेदार नक्षी व पालखीच्या पुढे शार्दुल (सिंह) अशा विविध प्रतिकृती सुबकतेने बनविण्यात आल्या आहेत. 

ही चांदीची पालखी देवाच्या सेवेसाठी आज मंदिरात अणण्यायात आली. पुजारी व मानकऱ्यांच्या हस्ते पूजा करून मुख्य मंदिरातून वाजत गाजत ही पालखी भानस मंदिरात नेण्यात आली. या वेळी पालखी मार्गावर अनेक सुहासिनींनी हळदी-कुंकू लावून, पालखीला पाणी घालून, आरती ओवाळून, आंबीलचा नैवेद्य देऊन पूजा केली. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com