मोहोळमधील चौक ठरतोय स्पॉटमृत्यूचा सापळा

राजकुमार शहा 
मंगळवार, 29 मे 2018

मोहोळ : मोहोळ शहराजवळील सिमोल्लंघन पांद चौक हा ब्लॅक स्पॉटमृत्युचा सापळा म्हणुन ओळखला जाऊ लागला असुन आज पर्यत झालेल्या अपघातात या ठिकाणी तीस जणांचा मृत्यु झाला आहे. तर सत्तावन्न जण जखमी झाले आहेत. अपघाताचे प्रमाण कमी व्हावे यासाठी या ठिकाणी भुयारी मार्ग व्हावा अशी मागणी गेल्या दोन ते तीन वर्षापासुन शहरवासिय करता आहेत. त्या साठी अनेक सामाजिक संस्था राजकीय पक्ष यांनी वेळोवेळी अंदोलने करून निवेदने दिली. मात्र त्यांना केराची टोपली दाखविण्याचे काम संबंधीत विभागाने केले आहे. आणखी किती बळी गेल्यानंतर या ठिकाणी उपाययोजना होणार अशी विचारणा शहरवासिय करत आहे. 

सोलापुर पुणे राष्ट्रीय महामार्गावर मोहोळ शहराजवळच हा मृत्यु चौक आहे. चौकाच्या परिसरात महाविद्यालये, रुग्णालये, विविध व्यावसायिक व गॅरेज आहेत. याच चौकातुन शहराचा मुख्य भाग असलेली कुंभार खाणी गाढवे वस्ती व बाभुळगाव रस्ता आहे. या सर्वांच्या माध्यमातुन या ठिकाणाहुन दररोज किमान पाच ते सात हजार नागरीकांची ये जा असते. सोलापूर व पुण्याकडुन येणाऱ्या वाहनचालकाला या चौकाच्या राबत्याचा अंदाज न आल्याने मोठमोठे जीवघेणे अपघात होता. 

 गेल्या दोन ते तीन वर्षापासुन मोहोळ शहरवासियाकडुन अपघात कमी व्हावेत यासाठी उड्डाण पुल वा भुयारी मार्गाची मागणी होत आहे. यासाठी सामाजिक संस्था राजकीय पक्ष यांच्याकडुन मोठमोठी अंदोलने करण्यात आली. मात्र संबंधित अधिकारी अशा वेळी पोलिस बंदोबस्तात येतात व निवेदन स्विकारतात व आम्ही वरिष्ठांना कळवा सिमोल्लंघन पांद चौक हा ब्लॅक स्पॉटमृत्युचा सापळातो अशी फॉर्मसलिटी पुर्ण करतात हा कार्यक्रम गेल्या दहा वर्षापासुन  सुरू आहे. 

या चौक परिसरातील विद्यालयात शाळेसाठी गेलेला विध्यार्थी सुखरूप घरी येईपर्यंत पालकाच्या जीवात जीव नसतो. या चौकातुनच गाढवे वस्ती कुंभारखाणी व बाभुळगावकडे जाणारा रस्ता आहे. या ठिकाणाहुन मोठी रहदारी असते तात्पुरता उपाय म्हणुन  या ठिकाणी प्रशासनाने गतीरोधक तयार केले होते मात्र ते भुईसपाट झाले आहेत त्या ठिकाणी मोठे व रबरी गतीरोधक बसवावेत अशी मागणीही नागरिक करीत आहेत या ठिकाणच्या अपघातात सर्वात जास्त बळी शाळकरी विद्यार्थ्यांचे गेले आहेत हे सर्व थांबवायचे असेल तर या ठिकाणी कायम स्वरूपी उपाययोजना होणे गरजेच .आहे 

आजपर्यत झालेले अपघात त्यातील मृत व जखमी पुढीलप्रमाणे 
एकुण अपघात            29 
त्यात एकुण मृत         30 
गंभीर एकुण अपघात   34 
त्यात एकुण जखमी     57  
किरकोळ अपघात       10

Web Title: Simhalilghan Pand Chowk is Black Spot