सातारा लोकसभेसह सहा विधानसभा मतदारसंघांची एकाच वेळी मोजणी I Election Results 2019 

voting counting center
voting counting center

सातारा : लोकसभेसोबत विधानसभेच्या सहा मतदारसंघांची एकाच वेळी मतमोजणी सुरू होणार असून, सकाळी आठ वाजता मोजणीस सुरवात होणार आहे. पहिल्यांदा पोस्टल मते मोजल्यानंतर साडेआठ वाजता प्रत्यक्ष मतमोजणी सुरू होईल. नऊ वाजता सहा मतदारसंघांसह लोकसभेच्या पहिल्या फेरीचा निकाल हाती येईल, अशी माहिती जिल्हाधिकारी श्‍वेता सिंघल यांनी दिली. दरम्यान, सर्वाधिक 33 फेऱ्या या पाटण विधानसभेच्या असल्याने अंतिम निकाल हाती येण्यास 12 तास लागणार आहेत, असेही त्यांनी स्पष्ट केले.
 

लोकसभा व विधानसभेच्या मतमोजणीची माहिती देण्यासाठी श्‍वेता सिंघल यांनी आज पत्रकारांशी संवाद साधला. आठ विधानसभा मतदारसंघांपैकी फलटण आणि माणची मतमोजणी त्या मतदारसंघांत होईल. सातारा लोकसभा व सहा विधानसभा मतदारसंघांची मोजणी साताऱ्यातील वखार महामंडळाच्या गोदामात होईल.

सकाळी आठ वाजता मोजणीस सुरवात होईल. प्रथम पोस्टल मतांची मोजणी केली जाईल. साडेआठ वाजता प्रत्यक्ष मोजणी सुरू होईल. एका फेरीला साधारण 20 मिनिटे असा वेळ धरल्यास नऊपर्यंत पहिल्या फेरीचा निकाल समजेल. हॉलमध्ये विधानसभेची आणि लोकसभेची विधानसभा मतदारसंघनिहाय मोजणी एकाच वेळी होईल. सफेद कापड असलेल्या टेबलांवर लोकसभेची तर लाल कापड असलेल्या टेबलावर विधानसभेची मोजणी होईल. सातारा लोकसभेसाठी 14 टेबल, विधानसभेसाठी 14, तसेच पाटणला 12, वाई 14, कोरेगाव 11, कऱ्हाड उत्तर 11, कऱ्हाड दक्षिण 20 टेबलवर मोजणी होईल. मतमोजणीच्या फेऱ्यांमध्ये (राउंड) सातारा 31, कोरेगाव 32, वाई 32, कऱ्हाड उत्तर 31, कऱ्हाड दक्षिण 30, पाटणसाठी 33 फेऱ्या होतील. किमान एक फेरी मोजण्यासाठी 20 ते 25 मिनिटे लागतील. त्यामुळे संपूर्ण मोजणी होण्यासाठी अकरा तास आणि एक तास व्हीव्हीपॅटची तपासणी याप्रमाणे 12 तास मतमोजणी चालेल. सकाळी आठ ते रात्री आठ वाजेपर्यंत मोजणी चालेल आणि अंतिम निकाल देण्यास रात्री दहा वाजतील, असेही त्यांनी स्पष्ट केले. 

पोस्टलचे आतापर्यंत 5,626 मतदान
 
पोस्टल मतदानामध्ये आतापर्यंत पाच हजार 626 मतदान झाले आहे. तर सरकारी कर्मचाऱ्यांचे एक हजार 350 मतदान झाले आहे. उर्वरित कर्मचारी व पोलिसांचे मतदान राहिले आहे. ते संबंधितांनी मतदान करून ते आजच टपाल कार्यालयात द्यावे. एकदा मतमोजणी सुरू झाल्यावर कोणत्याही स्वरूपात पोस्टल मतदान स्वीकारले जाणार नाही, असेही श्‍वेता सिंघल यांनी स्पष्ट केले. 
 

पाच हजारांच्या आसपास पोलिस बंदोबस्त 

मतमोजणीसाठी मोठ्या प्रमाणात पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. यामध्ये 1500 होमगार्ड, 2800 पोलिस, सीआयएसएफच्या तीन तुकड्या, एसआरपीची एक कंपनी असा एकूण पाच हजारांच्या आसपास पोलिस बंदोबस्तास आहेत. त्यात मतदान केंद्रात 200, तसेच तणाव नियंत्रणासाठी विविध ठिकाणी 900 पोलिस बंदोबस्तास असतील. मतमोजणी केंद्राच्या बाहेर आघाडी आणि युतीच्या कार्यकर्त्यांना निकाल ऐकण्यासाठी स्वतंत्र सोय करण्यात आली आहे. यामध्ये चार ते पाच हजार कार्यकर्ते उभे राहू शकतील, अशी माहिती पोलिस अधीक्षक तेजस्वी सातपुते यांनी दिली. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com