सिंधुदुर्गावरील शिवराजेश्वर मंदिर संवर्धनाच्या कामास पुरातत्वची मंजूरी

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 9 नोव्हेंबर 2017

कोल्हापूर - छत्रपती शिवाजी महाराज यांचे सिंधुदुर्ग किल्ल्यावरील ऐतिहासिक शिवराजेश्वर मंदिराचे जतन व संवर्धन करण्याच्या हेतुने पुरातत्व खात्याने लवकरात लवकर पाऊले उचलावीत यासाठी खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी मंगळवारी पुरातत्व खात्याच्या महानिदेशक उषा शर्मा यांची नवी दिल्ली येथे भेट घेतली. यावेळी शर्मा यांनी मंदीराच्या संवर्धन कामास मंजूरी दिल्याचे सांगितले.

कोल्हापूर - छत्रपती शिवाजी महाराज यांचे सिंधुदुर्ग किल्ल्यावरील ऐतिहासिक शिवराजेश्वर मंदिराचे जतन व संवर्धन करण्याच्या हेतुने पुरातत्व खात्याने लवकरात लवकर पाऊले उचलावीत यासाठी खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी मंगळवारी पुरातत्व खात्याच्या महानिदेशक उषा शर्मा यांची नवी दिल्ली येथे भेट घेतली. यावेळी शर्मा यांनी मंदीराच्या संवर्धन कामास मंजूरी दिल्याचे सांगितले.

सिंधुदुर्ग किल्ल्याला छत्रपती शिवाजी महाराज यांच्या आरमारात फार महत्व होते. शिवछत्रपतींनी बाधंलेल्या किल्ले सिधुंदुर्गावर असलेल्या ऐतिहासीक शिवराजेश्वर मंदीराचे व इतर वास्तूंचे जतन व संवर्धन होणे गरजेचे आहे. भुईकोट आणि डोंगरी किल्यांच्या बरोबरीने सागरी मार्गावरील शत्रूंची स्वारी परतून लावण्यासाठी जलदुर्गाची निर्मिती महत्त्वाची आहे, हे ओळखून शिवाजी महाराजांनी सागरी किल्ले निर्माण केले. सिंधूदुर्ग हा त्यापैकी एक..!
या किल्ल्याचे क्षेत्र कुरटे बेटावर ४८ एकरात पसरलेले असून सिंधुदुर्गावर शिवपुत्र राजाराम महाराजांनी बाधंलेले हे शिवछत्रपतींचे मंदीर, महाराजांच्या हाताचा व पायाचा उमटलेला ठसा, राजर्षी शाहु महाराजांनी मंदीरा समोर बाधंलेला सभा मंडप या सर्व गोष्टी खूप अमुल्य आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांचे हे महाराष्ट्रातील असे मंदिर आहे जेथे सर्व प्रकारचे सन उत्सव साजरे केले जातात त्यामुळे हे मंदिर महाराष्ट्रातील तमाम शिवभक्तांचे श्रद्धास्थान आहे.

भारत सरकारने सिंधुदुर्ग किल्ल्याला दिनांक २१ जून २०१० रोजी महाराष्ट्रातील राष्ट्रीय सरंक्षित स्मारक म्हणून घोषित केल्यानंतर या मंदिराच्या संवर्धनाचे जे काम होते ते ठप्प झाले होते. त्यामध्ये मंदिराच्या गाभा-यातिल काम, सभा मंडपाचे काम यासह बऱ्याच ठिकाणी मंदिरात पाण्याची गळती होत असल्याचे निदर्शनास आले होते व हे काम २०१० पासून रखडलेले आहे. यामुळे शिवप्रेमीं कडून मंदिराच्या अवस्थेबद्दल नाराजी व्यक्त केली जात होती. रायगड संवर्धन कामाची सुरूवात होण्यासाठी रायगड प्राधिकरणाची स्थापना करण्यात येणार आहे. रायगड बरोबर सिंधुदुर्ग किल्ल्यालाही विशेष महत्व असल्यामुळे या किल्ल्याचेही जतन व संवर्धन होण्यासाठी सिंधुदुर्ग किल्ला प्राधिकरणामध्ये सामाविष्ट व्हावा अशी आग्रही मागणी खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी केली होती आणि ती मान्यही झाली आहे.

राज्य सरकारने वारंवार पुरातत्व विभागाशी पत्र व्यवहार करुन या मंदिराचे काम चालू करणे किती महत्वाचे आहे हे पटवून दिले तरी सुद्धा या कामाला पुरातत्व खात्याकडून परवानगी मिळत नव्हती. मंगळवारी खासदार संभाजीराजे यांनी तमाम शिवभक्तांच्या भावना पुरातत्व खात्याच्या महानिदेशक उषा शर्मा यांना सांगितल्या. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Sindhudurg News Sambhaji Raje Press