सोलापुरात भावजीकडून मेहुण्यावर हल्ला

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 7 मार्च 2017

यापूर्वीच सासरच्या लोकांवर गुन्हा दाखल
सासरच्या मंडळींकडून पैशासाठी त्रास दिला जातो, म्हणून यापूर्वीच मडिवाळप्पा इरणणा कलशेट्टी (माड्याळ जिल्हा गुलबर्गा) यांच्यासह सासरवाडीच्या लोकांवर गुन्हा दाखल आहे.

सोलापूर - गोंधळे वस्ती येथे भावजीकडून बहिणीला वारंवार त्रास देत असल्याने बहिणीला माहेरी आणले. त्याचा राग मनात धरुन आज (मंगळवार) सकाळी भावजी व त्याच्या तीन साथीदारानी मिळून मेहुण्याला मारहाण केल्याची घटना घडली.

आज मंगळवारी सकाळी साडेआठच्या सुमारास ही घटना घडली. अल्बण्णा संगप्पा कलशेट्टी (वय ३५, रा गोंधळे वस्ती शिवाजी नगर) असे जखमीचे नाव आहे.

घटनास्थळावरुन मिळालेल्या माहितीनुसार अल्बण्णा हे आज सकाळी त्यांच्या चार वर्षाच्या मुलाला घेउन हनुमान मंदिरात निघालेले होते. त्यावेळी जीपमधून येउन त्यांनी गोंधळीवस्ती चौकाजवळ अडवले व तिक्ष्ण हत्याराने वार केले. त्यात अल्बण्णास हे गंभीर जखमी झाले व रक्ताच्या थारोळ्यात रस्त्यावर पडले लोकांची गर्दी होताच मारहाण करणारे पळून गेले. रस्त्यावरील लोकानी जखमीला रिक्षातून शासकीय रुग्णालयात दाखल केले.

यापूर्वीच सासरच्या लोकांवर गुन्हा दाखल
सासरच्या मंडळींकडून पैशासाठी त्रास दिला जातो, म्हणून यापूर्वीच मडिवाळप्पा इरणणा कलशेट्टी (माड्याळ जिल्हा गुलबर्गा) यांच्यासह सासरवाडीच्या लोकांवर गुन्हा दाखल आहे. त्यानंतरही त्रास थांबला नाही त्यामुळे अल्बण्णा यानी बहिनीला (महानंदा) याना सहा महिन्यापूर्वी माड्ड्याळ वरुन सोलापूरात आणले होते. ती केस मागे घ्यावी त्याच कारणावरुन आज अल्बणणा याना मारहाण झाल्याचे अल्बण्णा यांच्या पत्नीने सांगितले.

Web Title: sister-in-law attacked brother-in-law in Solapur