चार दिवसांत परिस्थिती नियंत्रणात - पालकमंत्री 

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 18 नोव्हेंबर 2016

कोल्हापूर - पाचशे आणि हजार रुपयांच्या नोटा चलनातून रद्द केल्यानंतर निर्माण झालेली गोंधळाची परिस्थिती येत्या तीन-चार दिवसांत निवळेल, असा विश्वास पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी "सकाळ'शी बोलताना व्यक्त केला. वारंवार पैसे बदलूनही पुन्हा तेच ते लोक रांगेत दिसत आहेत. यावरून सर्वसामान्यांपेक्षा ज्यांच्याकडे अधिकचा पैसा आहे त्यांनाच त्रास होत आहे. 

दहशतवादी, नक्षलवादी आणि काळाबाजार करणाऱ्यांमुळे देशात समांतर अर्थव्यवस्था निर्माण झाली होती. ही समांतर अर्थव्यवस्था संपूर्ण अर्थव्यवस्थेवर कब्जा करण्याची शक्‍यता होती. त्यामुळेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अगदी ऐनवेळी पाचशे आणि हजार रुपयांच्या नोटा चलनातून बाद करण्याचा निर्णय घेतल्याचे पालकमंत्री पाटील यांनी सांगितले. पंतप्रधान मोदी कोणता निर्णय कधी घेतील, याची कोणालाच माहिती नसते. त्यांच्या स्वतःच्या आईलाही या निर्णयाची माहिती नव्हती. त्यामुळे त्या माउलीलाही पैसे बदलण्यासाठी रांगेत उभा राहावे लागले. 

निर्णय घेतल्यानंतर आता त्यात बदल करणे अशक्‍य आहे. सर्वसामान्यांना फारसा त्रास होत नाही. पैसे घरात दाबून ठेवलेल्यांना त्रास वाटतो आहे. गेल्या आठवड्याभरात गरजेपुरते पैसे निश्‍चित उपलब्ध होत आहेत. मोठा निर्णय घेतल्यानंतर समोर येणाऱ्या अडचणी सोडवण्यासाठी यंत्रणा प्रयत्न करत आहे. पैसे बदलणाऱ्यांमध्ये कोण आहे यावर नजर टाकली तर तेच ते चेहरे दिसत आहेत. त्यांना चाप लावण्यासाठीच बोटावर शाई लावण्याचा निर्णय घेतला आहे. जुन्या नोटा बदलून नव्या देण्यासाठी काही काळ जाणार आहे. 

जिल्हा बॅंकांवर राजकीय व्यक्तींचे वर्चस्व आहे. त्या माध्यमातून मोठ्या प्रमाणावर काळा पैसा आला असता. त्यामुळेच त्यांना नोटा बदलून देण्यास बंद केले आहे. नवीन नोटांची छपाई मोठ्या प्रमाणावर सुरू आहे. पाचशेच्या नोटाही बाजारात आल्या आहेत. त्यामुळे पुढील चार-पाच दिवसांत परिस्थिती पूर्वपदावर येईल, असेही त्यांनी सांगितले. 

Web Title: The situation under control in four days