शिवेंद्रसिंहराजेंचा शब्द अंतिम राहणार

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 4 मार्च 2017

सायगाव - जावळी पंचायत समितीवर आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेसने ‘घड्याळा’चा झेंडा फडकवला आहे. त्यामुळे सभापती, उपसभापती निवडीत शिवेंद्रसिंहराजेंचा शब्द अंतिम मानला जाणार हे निश्‍चित. सर्वसाधारण महिला आरक्षित असलेल्या सभापतिपदासाठी सायगाव गणातील जयश्री गिरी, म्हसवे गणातील अरुणा शिर्के यांच्या नावांची चर्चा आहे, तर उपसभापतिपदासाठी दत्ता गावडे यांच्या नावाची चर्चा आहे.

सर्वसाधारण महिला सभापती आरक्षण असल्यामुळे आपल्याच पत्नीला सभापतिपद मिळावे, यासाठी पतीराजांनी जोरदार ‘फिल्डिंग’ लावण्यास सुरवात केली आहे. तालुक्‍यात दोन गण सर्वसाधारण महिला राखीव आहेत. त्यातील म्हसवे गणातून अरुणा शिर्के, तर सायगाव गणातून इतर मागास प्रवर्गातील असूनही जयश्री गिरी या खुल्या प्रवर्गातून या ठिकाणी निवडून आल्या आहेत. आरक्षण नसतानाही खुल्या प्रवर्गातून गिरी यांनी मिळवलेला विजय हा पक्षाच्यादृष्टीने मोठा विजय आहे. त्यामुळे शिर्के 

या जरी सभापतिपदाच्या प्रबळ दावेदार मानल्या जात असल्या तरी गिरींचेही नाव या पदासाठी जोरदार चर्चेत आले आहे.

म्हसवे गटातून जिल्हा परिषदेऐवजी खर्शी-बारामुरे गणातून निवडून आलेल्या दत्ता गावडे यांनाही पक्ष नेतृत्वाने गटातील उमेदवारीऐवजी गणाची उमेदवारी देताना उपसभापतिपद दिले जाईल, असा शब्द दिल्याचे बोलले जात आहे. त्यामुळ उपसभापतिपदासाठी तेच प्रबळ दावेदार दिसत आहेत. जर वसंतराव मानकुमरे यांना जिल्हा परिषदेत मोठे पद दिले गेले, तर पंचायत समितीमधील या निवडी करताना शिवेंद्रसिंहराजे भोसले यांना भौगोलिक समतोल साधून निर्णय घ्यावा लागणार हे निश्‍चित. त्यामुळे ते नेमके कशा पद्धतीने या निवडी करतात, याकडेच तालुक्‍यातील जनतेचे लक्ष लागून राहिले आहे.

विधानसभा डोळ्यासमोर ठेवून होणार निवडी!
मागील विधानसभा निवडणूक डोळ्यासमोर ठेवून बेरजेचे राजकारण करत शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी आरक्षण नसतानाही सुहास गिरींना सभापतिपद दिले होते. त्यामुळे त्यांनी प्रामाणिकपणे कुडाळ गटातून ‘राष्ट्रवादी’ला मताधिक्‍य दिले. यावेळीही असाच विचार होऊन जयश्री गिरींना सभापतिपद, तर दत्ता गावडे यांना उपसभापतिपद देवून पक्षश्रेष्ठी त्यांना दिलेला शब्द पाळतील, अशी तालुक्‍यात चर्चा आहे.

Web Title: Sivendrasinharaje be the final word