नगर - अशोक कारखान्याच्या सहा संचालकांची पदे रद्द 

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 10 एप्रिल 2018

नगर :  श्रीरामपूर येथील अशोक सहकारी साखर कारखान्याच्या सहा संचालकांची पदे रद्द करण्यात आली आहेत. पीक कर्जाचे थकबाकीदार असल्याचे समोर आल्यामुळे महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 नुसार ही कारवाई प्रादेशिक सहसंचालक (साखर) कार्यालयाने केली आहे. 

सुरेश मच्छिंद्र गलांडे, रावसाहेब हरी थोरात, बबन बापुराव मुठे, सुलोचना माणिकराव पवार, आबासाहेब बाबासाहेब गवारे आणि दिगंबर सर्जेराव शिंदे अशी संचालकपद रद्द झालेल्यांची नावे आहेत. सहकारी संस्थेची निवडणूक लढविताना किंवा त्यावरील कोणतेही पद उपभोगताना कोणत्याही सहकारी संस्थेची थकबाकी संबंधितांकडे नसावी, असा नियम आहे. या संचालकांनी आपापल्या गावातील विविध कार्यकारी सेवा संस्थेकडून घेतलेले पीक कर्ज जमा न करता थकित ठेवले. याच कारणावरून अन्य पाच जणांनाही नोटिसा दिल्या होत्या. मात्र त्यापैकी चौघांनी कर्ज जमा करण्यासाठी दिलेल्या मुदतवाढीमध्ये कर्ज जमा केले आणि एकाच्या नावावर चुकून कर्जाचे व्याज दाखविण्यात आले होते. ते त्यांनी सुनावणीत पुराव्यासह दाखवून दिल्यामुळे या सर्वांवरील संचालकपद रद्दचे गंडांतर टळले. 

Web Title: Six directors of the Ashok factory have been canceled