दुधोंडीत आणखी सहाजण कोरोना बाधित...तालुक्‍यात रूग्णांचे अर्धशतक पार 

संजय गणेशकर
Friday, 10 July 2020

पलूस (सांगली)-  दुधोंडी ( ता.पलूस ) येथे क्वारंटाईन असलेल्या आणखी सहा जणांचे अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आले आहेत. दुधोंडीमधील कोरोना रुग्णांची संख्या 24 झाली आहे. तर पलूस तालुक्‍यातील कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांच्या संख्येने अर्धशतक पार केले आहे. तालुक्‍यातील एकूण रुग्णांची संख्या 53 झाली आहे. 

पलूस तालुक्‍यात कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊन झालेपासून एकही कोरोना पॉझिटिव्ह रूग्ण सापडला नव्हता. मात्र तालुक्‍यात सहा जून पासून पॉझिटिव्ह रुग्ण सापडणेस सुरुवात झाली. गेल्या पंधरा दिवसांत तर तालुक्‍यात कोरोनाने कहरच केला आहे. तालुक्‍यात दुधोंडी गाव तर कोरोनाचे हॉटस्पॉट बनले आहे. आज तेथे आणखी सहा कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण सापडले. पूर्वीच्या रुग्णांच्या संपर्कात आलेल्या सहा व्यक्तींचे अहवाल आज सकाळी पॉझिटिव्ह आले. सदर रुग्ण क्वारंटाईन असल्याने त्यांचे संपर्कात इतर कोणी आल्याची शक्‍यता कमी आहे, असे तहसीलदार राजेंद्र पोळ यांनी सांगितले. 

तालुक्‍यातील आणखी 25 जणांचे "स्वॅब' चे नमुने घेतल आहेत, त्यांचा अहवाल काय येणार? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. पलूस येथे दोन दिवसांपूर्वी एका महिलेचा अहवाल पॉझिटिव्ह आला होता. त्यांचे संपर्कात आलेल्या नागरिकांना क्वारंटाईन करण्यात आले होते. या सर्व जणांचे अहवाल निगेटिव्ह आल्याने पलूसकरांना दिलासा मिळाला आहे. सदर अहवाल निगेटिव्ह आल्याने पलूस शहरातील सर्व व्यवहार आज सकाळपासून पूर्ववत सुरू करण्यात आले.

संपादन : घनशाम नवाथे

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Six more corona infections in Dudhondi . Half a century of patients cross the taluka