कोथळे खून प्रकरणातील संशयित उपनिरीक्षक कामटेसह सहाजणांचा जामिन फेटाळला 

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 29 मे 2020

सांगली- संपूर्ण देशभर चर्चेत आलेल्या अनिकेत कोथळे खून प्रकरणातील संशयित आरोपी संशयित आरोपी पोलीस उपनिरीक्षक युवराज कामटे, हवालदार अनिल लाड, अरुण टोणे, रोहित शिंगटे, नसिरुद्दीन मुल्ला, झीरो पोलीस झाकीर पट्टेवाले यांचा जामीन अर्ज जिल्हा न्यायालयाने फेटाळला. कोविड- 19 अंतर्गत सर्व न्यायालयाना प्राप्त झालेल्या नव्या मार्गदर्शक तत्वानुसार सहाजणांचा जामिन फेटाळला. संशयितांच्या जामीन अर्जावर "सीआयडी' चे पोलीस उपअधीक्षक मुकुंद कुलकर्णी यांनी तीव्र आक्षेप घेतल्याने जामिन फेटाळण्यात आले. 

कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर कोविड-19 अंतर्गत कारागृहातील आरोपी व संशयितांना तात्पुरत्या स्वरूपात पॅरोल किंवा जामीनावर सोडण्यासाठी नियमावली तयार करण्यासाठी एका उच्चस्तरीय समितीची स्थापना करण्यात आली होती.. समितीच्या निर्णयानुसार कारागृहामधील शिक्षा लागलेले आरोपी तसेच चालू असलेल्या खटल्यातील संशयित आरोपींना तात्पुरत्या स्वरूपात पॅरोल किंवा जामीन देण्यासंदर्भात नुकतीच काही मार्गदर्शक तत्वे जाहीर केली आहेत. त्यानुसार कारागृह विभागाकडून पॅरोल किंवा जमिनाबाबत अर्ज आलेल्या आरोपींची नावे "लीगल एड' मार्फत न्यायालयात दाखल करण्याची कार्यवाही सध्या सुरू आहे. 

आरोपी किंवा संशयितांचे गुन्ह्याचे स्वरूप, गुन्ह्याची तीव्रता तसेच इतर सर्व भौगोलिक वातावरणाचा विचार करून सद्य परिस्थितीत कोणाला जामीन द्यायचा किंवा कोणाला पॅरोलवर सोडायचे याबाबत अर्ज आल्यानंतर "लीगल एड' मार्फत जिल्हा न्यायालयात हजर करून घेतले जातात. त्यावर सुनावणी होऊन आदेश होतात. सांगली येथे गाजलेल्या अनिकेत कोथळे खून प्रकरणातील सर्व संशयितांनी जामिनासाठी कारागृह विभागाकडे आपले अर्ज सादर केले होते. या अर्जावर सीआयडीचे उपअधीक्षक मुकुंद कुलकर्णी यांनी आक्षेप घेतला. गुन्ह्याचे गांभीर्य आणि संशयित जामिनावर बाहेर आल्यास खटल्यावर परिणाम होऊ शकतो असे उपअधीक्षक कुलकर्णी यांनी निदर्शनास आणून दिले. त्यामुळे खून प्रकरणातील सहा संशयितांचा जामिन अर्ज जिल्हा न्यायालयात फेटाळण्यात आला. 
 
स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Six people, including Sub-Inspector Kamte, suspected in the Kothale murder case, were denied bail