सहा हजार 418 विद्यार्थ्यांनी दिली 'टीईटी' 

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 15 जुलै 2018

सोलापुरातील दहा परीक्षा केंद्रावर सहा हजार 418 विद्यार्थ्यांनी ही परीक्षा दिली असल्याची माहिती प्राथमिकचे शिक्षणाधिकारी संजयकुमार राठोड यांनी दिली. 

सोलापूर - परीक्षा परिषद पुणे यांच्यावतीने घेतली जाणारी शिक्षक पात्रता परीक्षा आज झाली. सोलापुरातील दहा परीक्षा केंद्रावर सहा हजार 418 विद्यार्थ्यांनी ही परीक्षा दिली असल्याची माहिती प्राथमिकचे शिक्षणाधिकारी संजयकुमार राठोड यांनी दिली. 

आज झालेल्या शिक्षक पात्रता परीक्षेसाठी दोन पेपर होते. पहिल्या पेपरसाठी तीन हजार 774 विद्यार्थ्यांनी परीक्षा अर्ज भरले होते. मात्र, प्रत्यक्षात तीन हजार 411 विद्यार्थ्यांनीच प्रत्यक्षात परीक्षा दिली. त्याचबरोबर पेपर दोनसाठी तीन हजार 258 विद्यार्थ्यांनी अर्ज भरले होते. त्यापैकी तीन हजार सात विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. पेपर एकसाठी 363 विद्यार्थी तर पेपर दोनसाठी 252 विद्यार्थी गैरहजर राहिले. पेपर एक सकाळी साडेदहा ते एक तर पेपर दोन दुपारी दोन ते साडेचार या वेळेत झाला. या परीक्षेसाठी 326 अधिकारी व कर्मचाऱ्यांची नेमणूक केली होती. शहरातील सर्वच परीक्षा केंद्रावर परीक्षा सुरळीत पार पडल्याचेही श्री. राठोड यांनी सांगितले. परीक्षा जिल्हा परिरक्षक म्हणून उपशिक्षणाधिकारी सुलभा वठारे यांनी काम पाहिले. 
 

आपण एका क्लिकवर ताजे अपडेट्स आपल्या मोबाईलमध्येही मिळवू शकता.

Web Title: Six thousand 418 students give the TET test