फसवणूक केल्याप्रकरणी सोळाजणांवर गुन्हा दाखल

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 16 नोव्हेंबर 2016

सोलापूर - रेल्वेमध्ये नोकरीस लावतो म्हणून सोलापूरच्या 23 तरुणांची 69 लाख 95 हजार रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी सोळाजणांवर गुन्हा दाखल झाला आहे. या प्रकरणात आर्थिक गुन्हे शाखेने निवृत्त पोलिसासह त्याच्या पत्नी आणि मुलाला अटक केली आहे.

सेवानिवृत्त पोलिस हवालदार रमेश यल्लप्पा गायकवाड (वय 52 ), मंगल रमेश गायकवाड (वय 45), राहुल ऊर्फ लखन रमेश गायकवाड (वय 26, तिघे रा. सत्यसाईनगर, लोकसेवा हायस्कूलसमोर, सोलापूर) अशी अटक केलेल्या तिघांची नावे आहेत. 

यांच्यासह रमेश गायकवाडचा जावई राज्य राखीव पोलिस बलाचा जवान मंजेश जाधव (रा. एसआरपीएफ कॅम्प, सोरेगाव, सोलापूर), सुहास गायकवाड (रा. सोरेगाव, सोलापूर), सुमन रॉय ऊर्फ नसीम खान (रा. कोलकता), नीतिशकुमार, मिश्रा, यादव, निखिलकौर (रा. सिलिगुडी, पश्‍चिम बंगाल), प्रतीक चौधरी (रा. कांचनपाडा, पश्‍चिम बंगाल), सौरभ (रा. पाटणा, बिहार), पासवान (रा. कोलकता), उमेश कोटा (रा. कोटा, राजस्थान), गुप्ता (रा. कांचनपाडा, पश्‍चिम बंगाल), महेश गौडा (रा. उडिसा) यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. 

शासकीय सेवेत भरती होण्यासाठी प्रयत्न करणारे विजय अशोक शिंदे (वय 26, रा. व्यंकटेशनगर, अक्कलकोट रोड, सोलापूर) यांनी फसवणूक झाल्यानंतर पोलिस आयुक्तालयात तक्रारी अर्ज दिला होता. गुन्हे शाखेच्या पोलिस उपायुक्त पौर्णिमा चौगुले यांनी चौकशी करून या प्रकरणाचा तपास आर्थिक गुन्हे शाखेकडे दिला होता. शिंदे यांच्या फिर्यादीनुसार सोमवारी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

विजय शिंदे आणि आरोपी असलेला राहुल गायकवाड हे मित्र आहेत. सर्व मित्र पोलिस भरतीसाठी प्रयत्न करीत होते. राहुलनेच रेल्वेत नोकरी लावण्याचे आमिष दाखवले आणि कोलकत्याच्या सुमन रॉय याच्याशी संपर्क करून दिला. सर्व आरोपींनी मिळून बेरोजगार तरुणांकडून पाच ते सात लाख रुपये असे एकूण 69 लाख 95 हजार रुपये घेतले. सर्वांना कोलकता येथे नेऊन त्यांची रेल्वेतील मोटरमन, टीसी, गार्ड आदी विविध पदांसाठी परीक्षा घेतली. परीक्षेनंतर त्यांना प्रशिक्षण दिले. त्यानंतर नियुक्तिपत्र आणि ओळखपत्रही दिले. हे सर्व बनावट असल्याचे लक्षात आल्यानंतर शिंदे यांनी पोलिसांकडे तक्रार केली. 

आर्थिक गुन्हे शाखेचे सहायक पोलिस निरीक्षक सचिन पवार, कर्मचारी सचिन सुरवसे, उमेश माने, गजानन किणगी, महादेव हजेरी, अबरार दिंडोरे, कविता धायगुडे आदींच्या पथकाने गायकवाडसह तिघांना अटक केली आहे. 

ट्रेनिंगमध्ये शिकविले सामान्यज्ञान! 

परीक्षा घेतल्यानंतर सर्व उमेदवारांना बंद खोलीत ट्रेनिंग देण्यात आले. ट्रेनिंगमध्ये गणित, विज्ञानासह सामान्यज्ञान शिकविण्यात आले. रमेश गायकवाड आणि त्याच्या साथीदारांनी आणखी कोणाची फसवणूक केली असेल तर सहायक पोलिस निरीक्षक सचिन पवार यांच्याशी 9673996010 या क्रमांकावर संपर्क साधता येईल.

Web Title: Sixteen cases of alleged fraud case