वहन आकार वीजबिलाचाच भाग 

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 20 फेब्रुवारी 2017

सोलापूर - जून 2015 पर्यंत वीजबिलात स्थिर आकार आणि अस्थिर आकार असे दोन भाग होते. वीज आकार व वहन आकार हे पूर्वीच्या अस्थिर आकाराचे भाग आहेत. परंतु, आयोगाच्या तीन नोव्हेंबरच्या आदेशानुसार वीजबिलात स्थिर आकार, वीज आकार व वहन आकाराचा समावेश केला आहे. त्यामुळे वहन आकार हा नवीन आकार नसून वीजबिलाचाच भाग आहे. म्हणून वहन आकार लागू केल्याने वीजदरात वाढ झालेली नाही, असे मत "महावितरण'ने व्यक्त केले आहे. 

वीजदर निश्‍चित करण्याचे अधिकार महाराष्ट्र विद्युत नियामक आयोगाला आहेत. त्यात "महावितरण'ला बदल करण्याचे कोणतेही अधिकार नाहीत. त्यामुळे राज्यात घरगुती ग्राहकांच्या वीजबिलामध्ये "महावितरण'ला वाढ करता येत नाही. दिल्लीच्या तुलनेत राज्यात वीजदर वाजवीच आहेत. दिल्ली येथील नियामक आयोगाने घरगुती ग्राहकांना 0 ते 200 युनिटपर्यंत प्रतियुनिट चार रुपये, तर 201 ते 400 युनिटपर्यंत प्रतियुनिट पाच रुपये 95 पैसे असा वीजदर निश्‍चित केला असतानाही सरकारने वीजदरात मोठ्या प्रमाणात अनुदान दिल्यामुळे घरगुती ग्राहकांनी भरावयाचे वीजदर कमी आहेत. दिल्लीपेक्षा महाराष्ट्रात विजेचे दर जास्त आहेत हे म्हणणे सयुक्तिक नाही. "महावितरण'च्या तुलनेत दिल्लीमधील वीजदर कमी आहेत, अशा पद्धतीचा अपप्रचार विविध माध्यमांतून केला जात आहे. परंतु दिल्लीतील सरकारने 200 युनिटपर्यंत प्रतियुनिट दोन रुपये, तर 201 ते 400 युनिटच्या वापरापर्यंत प्रतियुनिट दोन रुपये 97 पैसे असे अनुदान ग्राहकांना दिले आहे. 

Web Title: The size of the electricity bill of the navigation