आयसीआयसीआयतर्फे कौशल्य विकास प्रशिक्षण कार्यक्रमाचा आरंभ

राजकुमार शहा
गुरुवार, 12 जुलै 2018

मोहोळ (सोलापूर) : "कौशल्य शिका व रोजगार मिळवा" या उपक्रमाअंतर्गत पापरी (ता. मोहोळ) येथे आयसीआयसीआय फाउंडेशन मार्फत कौशल्य विकास कार्यक्रम व कौशल्य विकास प्रशिक्षण कार्यक्रमाचा आरंभ सरपंच इंदुमती लोंढे यांच्या हस्ते नुकताच करण्यात आला असून, या फाउंडेशन मार्फत पापरी गावाची डिजिटल व्हिलेज म्हणून निवड झाली आहे. या उपक्रमांतर्गत ग्रामस्थांना मोफत सर्व समावेशक शेती, शेळी पालन, महिलांसाठी विविध घरगुती उद्योगांचे प्रशिक्षण देण्यात येणार असल्याची माहिती या उपक्रमाचे प्रोजेक्ट मॅनेजर दीपक पाटिल यांनी दिली.

या संदर्भात अधिक माहिती देताना पाटील म्हणाले, महिलांसाठी ग्रामस्थांसाठी घरगुती उद्योग, शेती पूरक इतर व्यवसायचे प्रशिक्षण प्रत्येकी 30 दिवसां प्रमाणे देण्यात येणार आहे, सामाजिक बांधीलकीच्या माध्यमातून हा उपक्रम राबविण्यात येत असून याचा मुख्य उद्देश रोजगार निर्मिती व महिला सक्षमीकरण हा आहे. हे काम जिल्हाभर सुरु असुन या माध्यमातुन, शिवणकला, दुग्ध व्यवसाय, गांडूळ खत निर्मिती, घरगुती विद्युत उपकरणे दुरुस्ती करने त्याची विक्री करने या घटकांचे प्रशिक्षण देण्यात येणार आहे. त्यामुळे महिलांच्या हाताला काम मिळून त्यांचा जीवनस्तर उंचवणार आहे तसेच बेरोजगारी कमी होणार आहे.

या वेळी जिल्ह्याचे डेव्हलपमेंट अधिकारी स्वप्निल ढेकळे, मध्य प्रदेशच्या प्रोजेक्ट मॅनेजर श्रीमती अर्पिता, सुवर्णा मर्दा,सरपंच इंदुमती लोंढे,उपसरपंच अजित भोसले, माजी सरपंच लक्ष्मण घागरे, समाधान भोसले ग्रा. पं. सदस्य चेतन चौधरी, पिंटू गायकवाड़, प्रशांत पाटील, ग्रामसेवक दीपक शेळके, कृषि सहाय्यक सुरवसे, जिप शाळेचे मुख्याध्यापक राजेन्द्र परदेशी, बचत गटाच्या महिला आदिसह ग्रामस्थ उपस्थित होते.

Web Title: skill development program from icici