सांगलीः आयर्विन पुलाच्या स्लॅबचा तुकडा कोसळला

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 13 डिसेंबर 2018

सांगली - कृष्णा नदीवरील ऐतिहासिक आयर्विन पुलास पुन्हा एकदा तडा गेल्याचे दिसून आले. पुलाच्या खालील बाजूचा स्लॅबचा तुकडा कोसळल्याचे आज सकाळी निदर्शनास आले.

सांगलीच्या सौंदर्यात भर घालणाऱ्या या ऐतिहासिक पुलाच्या कठड्यांना दोन वर्षांपूर्वी भेगा पडल्याचे स्पष्ट झाले होते. सार्वजनिक बांधकाम विभागाने तात्पुरती डागडुजी केली. आज सकाळी नदीवर पोहण्यास गेलेल्या काहींना पुलाखालील स्लॅब कोसळल्याचे निदर्शनास आले. पुलाच्या बाजूचा हा स्लॅब थोडा थोडा कोसळत असल्याने पुलाच्या स्लॅबच्या सळया उघड्या पडल्यात. 

८६ वर्षे जुन्या असलेल्या ऐतिहासिक आयर्विन पुलास पुन्हा धोका निर्माण झाला आहे. सार्वजनिक बांधकामने तातडीने उपाययोजना करून लवकरात लवकर डागडुजी करण्याची मागणी होत आहे. ब्रिटिशकालीन पूल शंभरीकडे वाटचाल करीत आहे. 

महाड येथील सावित्री नदीवरील ब्रिटिशकालीन पूल कोसळून झालेल्या दुर्घटनेनंतर आयर्विन पुलाचाही प्रश्न ऐरणीवर आला. पुलाचे स्ट्रक्‍चरल ऑडिट करण्याची मागणी सामाजिक कार्यकर्त्यांनी केली. प्रशासनाने पुलावरील अवजड वाहतूक बंद केली. मात्र सार्वजनिक बांधकामने या पुलाच्या देखभालीकडे अक्षम्य दुर्लक्ष केले आहे. स्लॅबचा थोडा थोडा भाग कोसळत असल्याने नागरिकांत भीतीचे वातावरण आहे. तातडीने उपाय करण्याची मागणी जोर धरू लागली आहे.

Web Title: A slab piece of Irwin bridge collapsed