दिंडोर्ले बंधूंची आरोग्य निरीक्षकास मारहाण

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 28 डिसेंबर 2016

कोल्हापूर  - प्रभागातील स्वच्छतेसाठी माणसे कमी का? असा जाब विचारत महापालिकेच्या आरोग्य निरीक्षकास नगरसेवक राजू दिंडोर्ले यांनी शिवीगाळ केली, तर त्यांचा चुलतभाऊ व चालक बाजीराव दिंडोर्ले यांनी आज मारहाण केली. जयवंत देवराव पवार असे निरीक्षकाचे नाव आहे. नगरसेवक दिंडोर्ले यांनी अंगावर धाऊन येऊन शिवीगाळ केल्याचे पवार यांनी म्हटले आहे. मारहाणीचे महापालिकेत दुपारी संतप्त पडसाद उमटले आणि कामकाज ठप्प झाले. मारहाणीसंबंधी नगरसेवक दिंडोर्ले यांना नोटीस पाठविणार असल्याचे सायंकाळी आयुक्तांनी सांगितले.

कोल्हापूर  - प्रभागातील स्वच्छतेसाठी माणसे कमी का? असा जाब विचारत महापालिकेच्या आरोग्य निरीक्षकास नगरसेवक राजू दिंडोर्ले यांनी शिवीगाळ केली, तर त्यांचा चुलतभाऊ व चालक बाजीराव दिंडोर्ले यांनी आज मारहाण केली. जयवंत देवराव पवार असे निरीक्षकाचे नाव आहे. नगरसेवक दिंडोर्ले यांनी अंगावर धाऊन येऊन शिवीगाळ केल्याचे पवार यांनी म्हटले आहे. मारहाणीचे महापालिकेत दुपारी संतप्त पडसाद उमटले आणि कामकाज ठप्प झाले. मारहाणीसंबंधी नगरसेवक दिंडोर्ले यांना नोटीस पाठविणार असल्याचे सायंकाळी आयुक्तांनी सांगितले.

मार्चमध्ये आरोग्य विभागाकडील संजय गेंडगे यांना दिंड्रोर्ले यांचा बंधू विशाल याने मारहाण केली होती. त्या वेळीही कामकाज बंद पाडले. नगरसेवक विरुद्ध कर्मचारी वाद उफाळून आला. नगरसेवकाने एखाद्या कर्मचाऱ्यास यापुढे मारहाण केली तर आम्हीही कर्मचारी एकत्रित करून संबंधित नगरसेवकाला मारहाण करू अशा इशारा कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष रमेश देसाई यांनी दिला होता. मध्यंतरी शिवसेना नगरसेवक अभिजित चव्हाण यांनी घरफाळा लावण्याच्या मुद्दयावरून विशाल सुगते यांना मारहाण केली होती. ते प्रकरण ताजे असताना आज सकाळी प्रभाग क्रमांक 75 तुळजाभवानी आपटेनगर या प्रभागात हातघाई झाली. भागात माणसे कमी का असा प्रश्‍न राजू दिंडोर्ले यांनी केला. त्या वेळी जयवंत पवार यांनी पंधरा कर्मचारी आपल्या भागासाठी आहेत. त्यातील चार जण रजेवर असल्याचे सांगितले. दिंडोर्ले यांचे बंधू विशाल यांनी पवार यांनी फोन करून घरी बोलाविल्याचा निरोप दिला, पवार व आरोग्य निरीक्षक अमर कांबळे यांच्यासोबत दिंडोर्ले यांच्या घरी निघाले होते. रावजी मंगल कार्यालयाच्या मुख्य रस्त्यातच त्यांची भेट झाली. तेथे दोघांत हातघाई झाली. नगरसेवक दिंडोर्ले यांनी गाडी थांबवून कामगार कमी दिल्याने पवार यांना शिवीगाळ केली. ते अंगावरही धाऊन गेले. कामगार कमी लावल्यास नोकरी सोडायला लावीन अशी धमकी दिल्याचे पवार यांनी कर्मचारी संघटनेच्या अध्यक्षांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे.

दरम्यान, या घटनेचे संतप्त पडसाद दुपारी महापालिकेत उमटले. पवार यांनी घटनेची कर्मचारी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांना दिले. दुपारी दीडच्या सुमारास कर्मचारी महापालिका चौकात एकत्रित आले. महापालिकेच्या मुख्य इमारतीसह विभागीय कार्यालयातील कामकाजही थंडावले. नगरसेवकांची मुजोरी थांबत नाही तोपर्यंत काम सुरू करणार नाही असा पवित्रा कर्मचाऱ्यांनी घेतला. वारंवार चर्चा करूनही नगरसेवकांच्या वृत्तीत फरक पडत नसून यापुढे जशास तसे उत्तर देण्याचा पवित्रा कर्मचाऱ्यांनी घेतला. अध्यक्ष रमेश देसाई, विजय वणकुर्दे, रमेश पोवार, गंभीर दखल घेत आयुक्तांशी संपर्क साधला. घटनेची माहिती पवार यांनी अध्यक्षांना निवेदनाद्वारे दिले. स्थायी समिती सभापती मुरलीधर जाधव. महापौरांचे पुत्र आदिल फरास यांनी घटनेची माहिती घेतली. कामकाज बंद करू नये असा काहींचा सूर होता. मात्र कर्मचारी म्हणण्यावर ठाम राहिले.

कर्मचारी संघानेही आयुक्तांना निवेदन दिले. नगरसेवक राजू दिंडोर्ले त्यांचे भाऊ विशाल आनंदराव दिंडोर्ले, दिंडोर्ले यांचे चुलते व चालक बाजीराव यांनी पवार यांनी सकाळी साडेआठच्या सुमारास रस्त्यात अडवून मारहाण केली. नगरसेवक दिंडोर्ले यांनी आरोग्य निरीक्षक गेंजगे यांनाही मारहाण केली आहे. दिंडोर्ले बंधूंमुळे कर्मचाऱ्यांत असंतोषाचे वातावरण आहे. या प्रकरणी नगरसेवक दिंडोर्ले, भाऊ विशाल व चालक बाजीराव यांच्यावर कारवाई करावी तसेच कर्मचाऱ्यांना संरक्षण द्यावी अशी मागणी केली.

दिंडोर्ले यांना नोटीस बजावणार
नगरसेवक राजू दिंडोर्ले यांनी मारहाणीसंबंधी नोटीस बजावणार असल्याचे आयुक्त पी, शिवशंकर यांनी सायंकाळी सांगतिले. नगरसेवक पद रद्द का करू नये अशी विचारणा होणार असून समाधानाकारक खुलासा न केल्यास कारवाईचा इशारा त्यांनी दिला. दिंडोर्ले हे मनसचे कार्यकर्ते आहेत. अपक्ष म्हणून ते निवडून आले असून भाजप-ताराराणी आघाडीला त्यांनी पाठिंबा दिला आहे.

दिंडोर्ले पिस्तूल दाखवून दम देतात
नगरसेवक राजू दिंडोर्ले यांनी सेवेत असलेल्या कर्मचाऱ्यांना वारंवार बोलावून अर्वाच्य शब्दांत शिवीगाळ करून मारहाण केली आहे. स्वतःच्या संरक्षणासाठी असलेली पिस्तूल दाखवून दम देत आहेत. कर्मचाऱ्यांत असंतोषाची भावना पसरली आहे. त्याचा निषेध म्हणून सर्व कामकाज बंद ठेवत असल्याचे संघटनेने निवेदनात म्हंटले आहे. दरम्यान, प्रकरणाची आयुक्तांनी गंभीर दखल घेतली. दिंडोर्ले यांना नोटीस बजावली जाणार असून त्यांचे नगरसेवकपद रद्द का करू नये अशी विचाणा केली जाणार आहे. खुलाश्‍यानंतर कारवाईचा निर्णय घेतला जाईल.

मगदूम यांचा खुलासा अपुरा
दरम्यान, नगरसेविका दीपा मगदूम यांनी पाणीप्रश्‍नावरून महापालिका मुख्य इमारतीस टाळे ठोकले होते. त्यासंबंधी आयुक्तांनी नोटीस बजावली होती. मगदूम यांना खुलासा करताना आयुक्तांना नोटीस बजावण्याचा अधिकार नसल्याचे सांगितले होते. हा खुलासा समाधानाकारक नसून त्यावर अभ्यास सुरू आहे गरज पडल्यास पुन्हा नोटीस बजावणार असल्याचे आयुक्त पी. शिवशंकर यांनी सांगितले.

Web Title: Slapping of Dindorle brothers to health supervisor