चिमुकल्या अवधूतचा आईच्या डोळ्यासमोरच मृत्यू 

small boy dead in accident sangli
small boy dead in accident sangli

कडेगाव (सांगली) : तालुक्यातील शाळगाव-कडेगाव रस्त्यावर विहापूर येथे भरधाव डंपरने जोरदार धडक दिल्याने अवधूत योगेश कुंभार (वय-2) या बालकाचा जागीच दुर्दैवी मृत्यू झाला. डोळ्यासमोरच स्वतःच्या एकुलत्या एक पोटच्या गोळ्याचा मृत्यू झाल्याचे पाहून आईने अक्षरशः हंबरडा फोडला. मन हेलावून टाकणाऱ्या घटनेने विहापूर गावांवर शोककळा पसरली आहे. ही घटना आज सकाळी साडे अकरा वाजण्याच्या सुमारास घडली. 

याबाबत बाबासाहेब अण्णा कुंभार (रा. विहापूर) यांनी कडेगाव पोलिसांत फिर्याद दिली असून पोलिसांनी डंपर चालक गणेश मोहन दोडके (रा.अपशिंगे,ता.कडेगाव) याच्यासह डंपर (एमएच 10 एक्यू 5083) ताब्यात घेतला.


याबाबत कडेगाव पोलिसांनी दिलेली अधिक माहिती अशी, शाळगाव-कडेगाव रस्त्यावर विहापूर येथे योगेश कुंभार यांचे घर आहे. आज सकाळी सव्वा अकरा वाजण्याच्या सुमारास अवधूत याची आई प्रियांका या आपल्या राहत्या घरासमोर रस्त्यावर थांबलेल्या दुध गाडीमध्ये दूध घालण्यासाठी गेल्या होत्या. यावेळी आपल्या आईसोबत दोन वर्षांचा चिमुकला अवधुतही गेला होता. प्रियांका यांनी डेअरीच्या गाडीमध्ये दूध घातले. यावेळी अवधूत रस्त्याच्याकडेला उभा होता. यावेळी अचानक शाळगावहून कडेगावकडे भरधाव वेगाने निघालेल्या डंपरने चिमुकल्या अवधूतला जोरदार धडक दिली. त्यामध्ये त्याच्या डोक्याला गंभीर इजा झाली, मोठ्या प्रमाणात रक्तस्त्राव झाल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला. ही सर्व घटना अवधूत याची आई प्रियांका यांच्यासमोर घडली. आपल्या एकुलत्या एक पोटच्या गोळ्याचा दुर्दैवी मृत्यू झाल्याने प्रियांका यांनी अक्षरशः हंबरडा फोडला.

यावेळी नागरिकांनी घटनास्थळी एकच गर्दी केली. अपघाताची माहिती मिळताच कडेगाव पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक संदीप साळुंखे, पोलिस उपनिरीक्षक जालिंदर जाधव यांच्यासह पोलिस पथकाने विहापूर येथे घटनास्थळी धाव घेतली. अपघाताच्या घटनेचा पंचनामा केला. तसेच डंपरसह चालक गणेश मोहन दोडके याला ताब्यात घेतले. अधिक तपास सहायक पोलिस निरीक्षक संदीप साळुंखे हे करीत आहेत.
 

 संपादन - धनाजी सुर्वे 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com