मुळा धरणाच्या कालव्यात पडला लहान मुलगा

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 14 मे 2018

मुळा धरणाच्या डाव्या कालव्यात एक आठ वर्षांचा मुलगा वाहून गेला आहे. आज (सोमवारी) सायंकाळी चार वाजता ही घटना घडली. कालव्याचे आवर्तन बंद करुन, मुलाची शोध मोहीम सुरु आहे. सार्थक मधुकर डुक्रे (वय ८, रा. काळे आखाडा) असे कालव्यात वाहून गेलेल्या मुलाचे नाव आहे. 

राहुरी - मुळा धरणाच्या डाव्या कालव्यात एक आठ वर्षांचा मुलगा वाहून गेला आहे. आज (सोमवारी) सायंकाळी चार वाजता ही घटना घडली. कालव्याचे आवर्तन बंद करुन, मुलाची शोध मोहीम सुरु आहे. सार्थक मधुकर डुक्रे (वय ८, रा. काळे आखाडा) असे कालव्यात वाहून गेलेल्या मुलाचे नाव आहे. 

डावा कालव्यातून ११ मे रोजी शेती सिंचनासाठी 250 क्युसेकने आवर्तन सोडले आहे. कालव्यात मुलगा पडल्याचे समजताच मुळा धरणाचे उपअभियंता शामराव बुधवंत यांनी आवर्तन तात्पुरते बंद केले आहे. राहुरी पालिकेचे नगरसेवक प्रकाश भुजाडी, आप्पासाहेब काळे, संदीप सांगळे, गोपीनाथ काळे व अन्य ग्रामस्थांनी शोध मोहीम सुरु केली आहे. नगर-मनमाड महामार्गाजवळ आकाश हॉटेल पर्यंत शोध घेण्यात आला. परंतु, सायंकाळी उशीरा पर्यंत सार्थक सापडला नव्हता. 

Web Title: Small boy falls into the canal of mula dam